बीड : ‘तू आमचे भांडण सोडविण्यासाठी का मध्ये पडतोय’, असे म्हणत रवींद्र ऊर्फ बाळू बनसोडे यांच्या डोक्यात दगड मारून त्यांचे डोके फोडले. ही घटना गेवराई तालुक्यातील गौंडगाव शिवारात घडली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात युवराज सर्जेराव सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार खरात करीत आहेत.
...
३९ हजार रुपयांच्या साहित्याची चोरी
बीड : येथील पेठ बीड भागातील एमआयडीसी परिसरातील एका विद्युत डीपी दुरुस्ती करण्याच्या शॉपचे शटर उचकटून चोरट्यांन आतील ३८ हजार रुपयांचे साहित्य लंपास केले. ही घटना १४ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात सूरज बोरुडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल सानप हे करीत आहेत.
...........
पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर बदडले
बीड : उसने दिलेले पैसे आणण्यासाठी गेलेल्या तुळशिराम केशव शेंबडे (रा. शेकटा, ता.गेवराई ) यांना तिघांनी मिळून बदडले. ही घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी १४ ऑगस्ट रोजी चकलंबा पोलीस ठाण्यात सीताराम रावण पंडित, मधुकर गाडे, लता पंडित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..........
भांडणाची कुरापत काढून मारहाण
बीड : अंबाजोगाई तालुक्यातील वीरभद्र कडगे हे शेतात जनावरे चारत होते. यावेळी जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांना कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना कांगणेवाडी शिवरात घडली. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात कडगे यांच्या फिर्यादीवरून अंतराम कांगणे, माणिक कांगणे, सागरबाई कांगणे, राधाबाई कांगणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नाईक बांगर हे करीत आहेत. याच प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, अंतराम यांच्या फिर्यादीवरून वीरभद्र कडगे, अनिकेत कडगे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चोमणे करीत आहेत.
..............