शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या पोलीस अधीक्षकपदी हर्ष पोद्दार; जी. श्रीधर यांची गडचिरोलीला बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 18:50 IST

हर्ष पोद्दार हे नागपूर येथे पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते.

ठळक मुद्देजी.श्रीधर यांची समादेशक पदावर बदली अंबाजोगाईचे अपर अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांची मुंबईला बदली

बीड : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर ज्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अशा सर्व वरिष्ठ पोलीसअधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी झाल्या. यामध्ये बीडचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांची गडचिरोली येथील भारत राखीव बटालीयन गट  क्र. १३ वडसा देसाईगंज येथे समादेशक पदावर बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी बीड पोलीस अधीक्षक पदावर नागपूरवरुन हर्ष पोद्दार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

हर्ष पोद्दार हे नागपूर येथे पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते. येत्या काळात विधानसभा निवडणूक आहे, बीड जिल्हा हा संवेदनशिल म्हणून ओळखला जातो. त्यामुळे निवडणूका भयमुक्त वातावरणात व निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आव्हान पोद्दार यांच्यापुढे असणार आहे.

यासोबतच अंबाजोगाईचे अपर अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांची मुंबई येथे राज्य गुप्त वार्ता विभागात बदली झाली. तर त्यांच्या जागेवर उस्मानाबादच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर पदभार स्वीकारणार आहेत. 

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसTransferबदली