शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

'हॅप्पी हायपोक्झिया' घातकच; ७० टक्के रुग्णांचा मृत्यू ४८ ते ७२ तासांच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 18:50 IST

कोरोनाची लक्षणे दिसू लागताच रूग्णांनी उपचारासाठी यावे असे आवाहन स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोव्हीड केअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरूग्णांनी लक्षणे जाणवताच उपचारासाठी यावे

अंबाजोगाई : कोरोनामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये ४८ ते ७२ तासांच्या आत मृत होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण हे ७० टक्के आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी कोरोनाची लक्षणे दिसू लागताच रूग्णांनी उपचारासाठी यावे असे आवाहन स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोव्हीड केअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांनी व्यक्त केले.

अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोवीड केअर हॉस्पिटलमध्ये ४ जून २०२० रोजी कोवीडचा पहिला रूग्ण आला. या रूग्णापाठोपाठ ट्रेसिंग दरम्यान त्याच्या कुटुंबातील इतर चार सदस्य पॉझिटीव्ह निघाले. आणि ही साखळी सतत वाढत गेली. हा पहिला रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक बरे होवून घरी गेले असले याचे समाधान असले तरी नंतर वाढत जाणारा मृत्युदर हा काळजी वाढवणारा आहे. मुळात कोरोना या आजाराबद्दल लोक अजूनही गांभीर्याने घेत नाहीत,ही खंत आहे. कोरोनाची लक्षणे दिसू लागताच उपचारासाठी आलेले शेकडो रूग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत. कोरोनामुळे उपचारासाठी येणा-या रूग्णांमध्ये पहिल्या ४८ ते ७२ तासात होणार्‍या मृत्यूचे दर ७० टक्केच्या आसपास आहे, असे निरीक्षण स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभाग प्रमुख तथा कोव्हीड केअर केंद्राचे प्रमुख डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांनी नोंदवले आहे. 

"हॅप्पी हायपोक्झिया".मुळे रुग्ण होतात गंभीर या संदर्भात बोलताना डॉ.बिराजदार पुढे म्हणाले की, कोरोनाच्या भितीमुळे मानसिक ताणतणाव निर्माण होतो. यामुळे मनात एक भीती निर्माण होऊन रूग्ण स्वतः आजार कोणालाही न सांगता अंगावर काढतो. जेव्हा आजार वाढतो,तेव्हा आपल्या फुप्फुसाचा ५० ते ७० टक्के भाग हा संक्रमित झालेला असतो. तेव्हा ऑक्सीजनचा पुरवठा करणे सुद्धा अवघड होते. या आजाराचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे "हॅप्पी हायपोक्झिया".या प्रकारात शरीरातील ऑक्सीजनची पातळी कमी होऊन सुद्धा ज्या प्रमाणात दम, लागायला पाहिजे तो लागत नसल्याने रूग्णांना आपल्या आजाराचा गंभीरपणा लक्षात येत नाही. म्हणून रूग्ण उपचारासाठी उशिरा येतो व त्याचा परिणाम त्याच्यावर उपचार करणं खुपचं अवघड होतं. हे सर्व टाळण्यासाठी  कुटुंबातील सर्व वयस्कर व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक घरी पल्स ऑक्सीमिटर हे छोटेसे यंत्र असणे गरजेचे असून त्यादृष्टीने सर्दी, खोकला, ताप आलेल्या रूग्णांचे ऑक्सीजनची पातळी तपासून, वेळीच उपचार सुरू केले तर चांगले परिणाम दिसून येतील. 

मानसिक कणखरता महत्वाची या आजारात मानसिक संतुलन राखू्न ठेवणे हे ही खुपच गरजेचे आहे. हा आजार असतांनाही अनामिक भितीने अनेक लोक रूग्णालयात येण्यास खुप उशीर करतात. किंबहुना अत्यंत अस्वस्थ झाल्यानंतरच हे रूग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये ७० वर्षांपुढील उच्च रक्तदाब, मधुमेह, न्युमोनिया, श्वसनाचे आजार व इतर आजार असणा-यांची संख्या खुप मोठी आहे. या रुग्णांच्या इतर सर्व टेस्ट करुन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वेळ जातो आणि परिणामी असे रूग्ण बारा ते चोवीस तासाच्या आतच दगावतात. कोरोनाची लक्षणे जाणवू लागताच उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांचा मृत्युदर त्या मानाने खुप कमी आहे असे रूग्ण औषधोपचारासोबत मानसिक समुपदेशानेही लवकर बरे होतात असा अनुभव आहे. मुळात कोरोना रुग्णांना घरातील लोकांनी व समाजातील लोकांनी त्याचे मानसिक बळ वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. ते फार कमी प्रमाणात होते असे दिसते. कोरोना विरूध्दचा लढा हा केवळ रूग्ण आणि डॉक्टर यांचाच नाही तर समाजातील सर्व घटकांचा आहे. सर्वांनी शासनाने लागू केलेले सर्व निर्बंध पाळत या लढ्यात सहभागी व्हायला हवे, असे आवाहनही डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड