आष्टी : तालुक्यातील निमगाव चोभा येथे स्टेट बँक ऑफ इंडिया व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेळाव्यात वित्तीय साक्षरतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ७ जानेवारी रोजी येथे डी.एस.एच., एस.बी.आय.शाखा कडा व निमगाव चोभा येथील ग्राहक सेवा केंद्राने मेळाव्याचे नियोजन केले होते.
बीड डीएसएचचे चीफ मॅनेजर आनंद मिश्रा ,असिस्टंट मॅनेजर एम. झेड. खान, एसबीआय कडा शाखेचे मॅनेजर मिलिंद रोठे , फिल्ड ऑफिसर अविनाश ढगे आदींनी ग्राहकांना बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,अटल पेन्शन योजना तसेच ऑनलाईन बँकिंग ऑनलाईन खाते यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एसबीआयचे कर्मचारी, ग्राहक सेवा प्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक ग्राहक सेवा केंद्र प्रतिनिधी मधुकर गिऱ्हे यांनी केले.
----------
माहिती देऊ नका, फसवणूक टाळा
ग्राहक सेवा केंद्र प्रतिनिधी हे बँकेने नियुक्त केलेले बँकेचे कर्मचारी आहेत.भविष्यात खातेदारांनी आपले बहुतांश व्यवहार आपल्या गावातील ग्राहक सेवा केंद्रातच करावे. फसवणूक टाळण्यासाठी खातेदारांनी आपली बँकेविषयीची कुठलीही माहिती कोणालाही सांगू नये, असे आवाहन डीएसएचचे चीफ मॅनेजर आनंद मिश्रा यांनी मेळाव्यात केले.