अविनाश मुडेगावकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : गाडीपेक्षा आपल्या गाडीचा नंबर दुसऱ्यांचे लक्ष कसे वेधून घेईल याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. लक्ष वेधून घेणारा आकर्षक (फॅन्सी) नंबर जेवढा आकर्षक तेवढी आपली पत मोठी असा समज अनेकांचा असतो. त्यामुळेच कोरोनाचा प्रभाव असतानाही फॅन्सी नंबरच्या शुल्कातून अंबाजोगाईच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयास मोठा महसूल मिळाला. १ नंबरसाठी तीन लाख तर ९९९ नंबरसाठी दीड लाख रुपये मोजावे लागत असले तरीही या दोन्ही नंबरला मागणी कायम आहे.
वाहनांना आकर्षक नंबर देण्याचे ‘फॅड’ नवे नाही. गाडीला ठराविक नंबर मिळावा, यासाठी आग्रही असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही बाब प्रादेशिक परिवहन विभागाने आपल्या पथ्यावर पाडून फॅन्सी नंबरच्या शुल्कात तीन ते चार पट वाढ केली. पूर्वी ‘एक’ हा फॅन्सी नंबर एक लाख रुपयांचा होता. तो शहरात तीन लाखांचा झाला आहे.
....
या तीन नंबर्सना सर्वाधिक मागणी
९९९- दीड लाख रुपये
९९९९-दीड लाख रुपये
११११-सत्तर हजार रुपये
...
हे नंबर्स घेण्यासाठी मोजावे लागतात ७० हजार
०१११,०२२२,०३३३,०४४४,०५५५,०६६६,०७७७,०८८८,११११,२२२२,३३३३,४४४४,५५५५,६६६६,७७७७,८८८८.
....
हे नंबर्स घेण्यासाठी मोजावे लागतात ५० हजार
०००२,०००३,०००४,०००५,००००६,०००७,०००८,००१०,००२२,१८१८,१५१५,५४५४,७००७.
....
आरटीओ विभागाची झालेली कमाई
सन-२०१९- ७५ लाख, ९० हजार ५०० रुपये
सन-२०२०- ६२ लाख ८१ हजार रुपये
जून-२०२१- ९ लाख ९६ हजार ५०० रुपये
...
एकूण वाहनांची संख्या-१५८९
...
कोरोना काळातही हौसेला मोल नाही
कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात नवीन वाहनांची खरेदी व त्या वाहनांना परवाना देण्याची प्रक्रिया सुरुच होती.
अशा आपत्तीच्या काळातही अनेकांच्या हौसेला मोल नव्हते. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर चॉईस नंबरसाठी अर्ज येत होते.
परंतु कोरोना आणि लॉकडाऊनच्या तुलनेत फॅन्सी नंबरची मागणी घटली. महसूल कमी झाला.
...
...तर नंबरसाठी होतो लिलाव.
काही वेळा उपलब्ध असलेल्या चॉईस नंबरसाठी अनेकजण मागणी नोंदवतात. आगाऊ पैसे भरण्याची त्यांची तयारी असते. अशा वेळी लिलाव करून हा नंबर दिला जातो. ही प्रक्रिया पूर्ण पारदर्शक असते.
...
वाहन मालकांना वाहनांची जशी आवड असते त्याचप्रमाणे आपल्या वाहनांना फॅन्सी नंबर असावा. अशी ही त्यांची आवड असते. ही आवड जोपासताना अनेकांचे काही लकी नंबर्स असतात. ते नंबर्स मिळवण्यासाठी त्यांची मोठी तयारी असते. फॅन्सी नंबरचे दर शासनाने जाहीर केलेले आहेत. त्याप्रमाणे नियमानुसार त्यांना नंबर्स दिले जातात. या प्रक्रियेमध्ये शासनाला ही महसूल मिळतो.
-दत्तात्रय सांगोलकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अंबाजोगाई.
....