शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लोकनेत्याच्या दर्शनासाठी गोपीनाथ गडावर अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 10:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच राज्याच्या कानाकोपºयातून कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर ...

ठळक मुद्देदिंडी, पताका, रथयात्रा, संघर्ष ज्योत घेऊन कार्यकर्ते दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच राज्याच्या कानाकोपºयातून कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर गर्दी केली होती. विविध भागातून रथ, दिंडी, पताका, टाळ मृदंगासह येत मुंडे अनुयायी समाधी स्थळावर पोहोचले. पालकमंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ. प्रीतम मुंडे यांची कुटुंबियांसह गडावर उपस्थिती होती. दरम्यान, वैद्यनाथ कारखान्यातील दुर्घटनेत मृत पावलेल्या कर्मचा-यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेमुळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने जयंतीदिनी आयोजित केलेले सामाजिक उपक्र मांचे सर्व कार्यक्र म रद्द करून जयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भगवानगड ते गोपीनाथ गड, नांदेड येथून हनुमान गड ते गोपीनाथ गड अशी अ‍ॅड. रमेश धात्रक यांची रथयात्रा आणि शिखर शिंगणापूर ते गोपीनाथगड अशी डॉ. राजेंद्र खाडे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष ज्योत घेऊन कार्यकर्ते गडावर आले होते. या दोन्ही यात्राचे पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी स्वागत केले.

सकाळी पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, प्रज्ञा मुंडे, डॉ. अमित पालवे, अ‍ॅड. यशश्री मुंडे, अगस्त्य खाडे आदी कुटुंबातील सदस्यांनी मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. नियोजित कार्यक्रमासाठी तयार असलेल्या मंडपात बसून पंकजा मुंडे व परिवाराने सर्वांचे अभिवादन स्वीकारले. वैद्यनाथ साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाºयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आ. आर. टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, आ. भीमराव धोंडे, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, जि. प. अध्यक्षा सवीता गोल्हार, माजी आमदार केशवराव आंधळे, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, ज्येष्ठ नेते फुलचंद कराड, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, राधा सानप, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदित्य सारडा, बंजारा नेते मांगीलाल चव्हाण, कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, रामराव खेडकर, धम्मानंद मुंडे, भास्कर रोडे, विजय गोल्हार, संतोष हंगे, नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी, सहाल चाऊस, पत्रकार अजित वरपे, विजयकुमार बंब, नरेंद्र कांकरिया, दिलीप खिस्ती आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.