शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मित्राने दिला होता चांगला सल्ला; तरीही बालाजी, संकेतने केला हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:55 IST

सुमित वाघमारे खून प्रकरणातील मुख्य आरोपी बालाजी लांडगे व संकेत वाघ या दोघांना त्यांच्या एका जिवलग मित्राने सुमितला मारु नका असा चांगला सल्ला दिला होता. मात्र, तरीही या दोघांनी १९ डिसेंबर रोजी सुमितवर हल्ला केला. हा प्रकार पोलीस तपासातून समोर येत आहे. विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वीच सुमितला मारण्याचा प्लॅन या आरोपींनी आखला होता, अशी माहिती पुढे येत आहे.

ठळक मुद्देतपासातील महत्त्वाचे मुद्दे : १५ दिवसांपूर्वीच सुमितला मारण्याचा रचला होता प्लॅन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सुमित वाघमारे खून प्रकरणातील मुख्य आरोपी बालाजी लांडगे व संकेत वाघ या दोघांना त्यांच्या एका जिवलग मित्राने सुमितला मारु नका असा चांगला सल्ला दिला होता. मात्र, तरीही या दोघांनी १९ डिसेंबर रोजी सुमितवर हल्ला केला. हा प्रकार पोलीस तपासातून समोर येत आहे. विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वीच सुमितला मारण्याचा प्लॅन या आरोपींनी आखला होता, अशी माहिती पुढे येत आहे.प्रेमप्रकरणातून सुमित वाघमारे या युवकाचा मेहुणा बालाजी व त्याचा मित्र संकेत याने धारदार शस्त्राने वार करुन खून केला होता. सुमितची पत्नी भाग्यश्रीच्या फिर्यादीवरुन पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी बालाजी, संकेत या मुख्य आरोपींसह कट रचणारे कृष्णा व गजानन रवींद्र क्षीरसागर यांना गजाआड केले होते. कृष्णा हा पोलिसांच्या कोठडीत आहे, तर बालाजी, गजानन व संकेत यांना बुधवारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.आता यापुढे तपासाला गती येणार असून, यातील सविस्तर माहिती पुढे येण्याची शक्यता आहेवाहन, हत्यारे जप्त करणे बाकीगुन्हा करण्यासाठी चारही आरोपींनी दुचाकी, जीप, कार या वाहनांचा वापर केला. तसेच सुमितला मारण्यासाठी वापरलेले हत्यारही जप्त करणे बाकी आहे. ते सहा दिवस कोठे फिरले ? याची माहितीही संकलित करणे बाकी आहे. त्या दृष्टीने तपास अधिकाऱ्यांनी पोलीस कोठडी मागितली आहे..कलेक्टर कार्यालयावर काढला मोर्चाखून करणाºया आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, पो. नि. शिवलाल पुर्भे यांची चौकशी करावी, भाग्यश्री वाघमारे हिला शासकीय सेवेत घ्यावे, फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवावा, वाघमारे कुटुंबियांचे सरकारच्या वतीने पुनर्वसन करावे, हा निकाल लागेपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये सुमितची आई, पत्नी भाग्यश्री सह त्यांचे कुटूंब व विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव सहभागी झाले होते. जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी