शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीच्या विरोधात गेल्याने एकास विषारी औषध पाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:32 IST

आष्टी : तालुक्यातील अंभोरा परिसरातील एका कंपनीतील कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात आवाज उठविणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्याला कंपनीतीलच काही अधिकाऱ्यांनी ...

आष्टी : तालुक्यातील अंभोरा परिसरातील एका कंपनीतील कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात आवाज उठविणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्याला कंपनीतीलच काही अधिकाऱ्यांनी विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ३ सप्टेंबरला घडलेल्या घटनेप्रकरणी कंपनीच्या मालकासह चौघांवर अंभोरा पोलीस ठाण्यात ११ सप्टेंबरला गुन्हा दाखल झाला.

आष्टी तालुक्यातील अंभोरा परिसरात कॅनफॅक्स कंपनी असून, या परिसरातील अनेक कर्मचारी काम करतात. या कंपनीत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये विविध कारणावरून वाद होत असायचे.

संतोष गजानन आमले (रा. अंभोरा, ता. आष्टी) हा या कंपनीत ऑपरेटर म्हणून कामाला होता.

संतोष याने कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन वाढवून मिळावे यासाठी कंपनीच्या विरोधात आवाज उठवला होता. कर्मचाऱ्यांना वेतन वाढवूनही मिळाले. परंतु, याचा राग मनात धरून कंपनीचे मालक सुभाष मुथा यांनी कंपनीतील अधिकाऱ्यांमार्फत संतोषवर आरोप करून त्याला कामावरून काढून टाकले. ३ सप्टेंबरला संतोष आमले हा कंपनीच्या समोरील स्वतःच्या शेतात काम करीत असताना कंपनीचे अधिकारी संदीप धोंडीबा सुरवसे, विकास विठ्ठल होले व बापूसाहेब सीताराम गायकवाड हे तिघे त्या ठिकाणी येऊन कंपनीच्या विरोधात आवाज उठवतोस का? असे म्हणत त्यांनी सोबत आणलेले विषारी औषध संतोषला पाजले. यावेळी संतोषने जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला असता आवाज ऐकून शेजारच्या शेतात काम करीत असलेले नातेवाईक संतोषच्या मदतीला धावत येऊन संतोषला नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ११ सप्टेंबरला संतोष गजानन आमले याने दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष मुथा, संदीप सुरवसे, विकास होले व बापूसाहेब गायकवाड यांच्यावर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने हे करीत आहेत.