शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

रोमिओंच्या त्रासाने मुली त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:39 IST

विद्यार्थिंनीना सडकसख्याहरींकडून मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याने याचा परिणाम विद्यार्थिनींच्या मानसिकतेबरोबरच शिक्षणावर होत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देदामिनी पथकाने लक्ष देण्याची पालकवर्गातून होत आहे मागणी

आष्टी : शहरात अनेक महाविद्याल व नर्सिंग स्कूल असून पाच शाळा तर काही क्लासेस आहेत याठिकाणी शहरातील व बाहेर गावातील आणि परिसरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी येतात. परंतु येणाऱ्या विद्यार्थिंनीना सडकसख्याहरींकडून मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याने याचा परिणाम विद्यार्थिनींच्या मानसिकतेबरोबरच शिक्षणावर होत असल्याचे दिसून येत आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ब्रीदवाक्य फक्त कागदावरच का ? पोलीस रोडरोमिओंचा बंदोबस्त करणार का, अशी विचारणा शहरातील व परिसरातील गावांतील पालकातून होत आहे.आष्टी येथे बाहेरच्या गावातून शिक्षणासाठी येणाºया मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.आष्टी बसस्थानक पासून शाळा महाविद्यालय लांब अंतरावर असल्याने बसस्थानक पासून कन्या शाळा, गणेश विद्यालय, पंडित नेहरू विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय सह तसेच कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,भगवान कॉलेज, नर्सिंग कॉलेज, कृषी महाविद्यालय काही क्लासेस परिसरात रोडरोमिओ कडून बाईकवर ट्रिपलसीट येऊन कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, शिट्टी वाजविणे, अश्लील हावभाव करणे, मुलींची छेड काढणे असे अनेक प्रकार होत आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयीन तरुणींनी महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे.पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक तालुक्यात दामिनी पथक नियुक्त केले आहे. परंतु हे दामिनी पथक आष्टी शहरात कारवाई का करत नाही, असा सवाल आहे. या रोडरोमिओना पोलिसांनी वेळीच लगाम घातला नाही तर मुलींना शिक्षण घेणे बंद करावे लागेल, अशी स्थिती आहे. या रोमिओंवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पालकांतून होत आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी