शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

गेवराई उपजिल्हा रूग्णालयात महिनाभरात २०० प्रसुतीचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 18:41 IST

पाच वर्षांपूर्वी व्हायच्या केवळ सरासरी ९० प्रसुती

ठळक मुद्देसुविधा अन् विश्वास वाढला 

बीड : गेवराई उपजिल्हा रूग्णालयात पहिल्यांदाच एका महिन्यात तब्बल २०० प्रसुती झाल्या असून पैकी २५ सिझर आहेत. पाच वर्षांपूर्वी सरासरी प्रति महिना केवळ ९० प्रसुती होत होत्या. आता केज, परळी पाठोपाठ गेवराईनेही हे रेकॉर्ड तयार केले आहे. या टिमचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी गुरूवारी रात्री १२ वाजता जावून रूग्णालयात स्वागत केले. सुविधा अन् विश्वास वाढल्यानेच हे शक्य झाल्याचे बोलले जात आहे.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी पदभार सिवकारताच जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रूग्णालयांचे रूपडे बदलून सुविधांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी केवळ केज व परळी उपजिल्हा रूग्णालयात एका महिन्यात २०० प्रसुती झाल्या होत्या. गेवराई उपजिल्हा रूग्णालयात २०१५ साली प्रति महिना सरासरी ९० ते ९२ प्रसुती होत असत. मात्र, सद्यस्थितीत हा आकडा २०० झाला आहे. आॅक्टोबर महिन्यात २५ सिझर आणि १७५ नॉर्मल प्रसुती करून नवा विक्रम गेवराई उपजिल्हा रूग्णालयाने आपल्या नावे केला. यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व टिमचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी गुरूवारी रात्री १२ वाजता रूग्णालयात जावून सत्कार केला. रात्री ११.४० वाजता वर्षा मोटे (२६ रा.ताकडगाव) या महिलेची २०० वी प्रसुती झाली. 

वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश शिंदे, डॉ.जगदिश पोतदार, डॉ.अमोल पिंगळे, डॉ.संतोष मारकड, डॉ.श्रीगोपाळ रांदड, डॉ.गोविंद लेंडगुळे, डॉ.प्रवीण सराफ, डॉ.अब्दुल रौफ, परिचारीका प्रियंका खरात, स्वाती टाकळकर, भारत गाजरे, विद्या आहेरवाडकर, अंजना आगवान आदींनी यासाठी परिश्रम घेतले.रूग्णालयाचीही केली पाहणीरूग्णालयाची पुर्विची स्थिती आणि आजची स्थिती तुलनात्मक करून डॉ.थोरात यांना दाखविण्यात आली. तसेच सर्वसामान्य वॉर्ड, शिशु गृह, शस्त्रक्रिया गृह, महिला वॉर्ड, ओपीडीसह सर्व परिसराची डॉ.थोरात यांनी पाहणी केली. अधीक्षक डॉ.राजेश शिंदे यांनी सर्व माहिती दिली. 

आरोग्य विभागाची प्रतिमा उंचावू चांगल्या कामासाठी शल्यचिकित्सकांचे नेहमीच सहकार्य असते. सामान्यांना तात्काळ आणि दर्जेदार सुविधा देण्याचा संकल्प आम्ही सर्वांनी केला होता, आणि तो पूर्ण करीत आहोत. आमच्या कामाची दखल घेऊन वरिष्ठांनी सन्मान केल्याने माझ्यासह टिमचे मनौधैर्य वाढले आहे. यापुढे आणखी भरपूर विक्रम करून आरोग्य विभागाची प्रतिमा उंचावून दाखवू.- डॉ.राजेश शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय, गेवराई

चांगल्या कामात सातत्य हवे कामचुकारांवर तर नेहमीच कारवाया केल्या जातात. काही डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे काम खुप चांगले आहे. त्यांना प्रोत्साहन देणे सुद्धा माझे काम आहे. २०० प्रसुती करून त्यांनी विक्रम केल्याने स्वत: येऊन त्यांचा सन्मान केला. यात त्यांनी सातत्य ठेवावे.- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीBeedबीडhospitalहॉस्पिटल