शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल गन्हेगार शहाद्याला ठोकल्या बेड्या, गेवराई पोलिसांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 17:08 IST

अखेर तो आहेर यांनी लावलेल्या सापळ्यात अडकला.

गेवराई : खून, दरोडा, लूटमार, बलात्कार, मारहाण असे विविध गुन्हे करण्यात तरबेज असलेला अट्टल गुन्हेगार शहाद्या उर्फ शहादेव विश्वास भोसले (२५ रा.नागझरी) याच्या सोमवारी रात्री मुसक्या आवळण्यात आल्या. गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या टीमने ही कामगिरी केली. मागील दोन वर्षांपासून तो पोलिसांच्या निशान्यावर होता. अखेर तो आहेर यांनी लावलेल्या सापळ्यात अडकला.गतवर्षी चिंचगव्हाण येथील बाळासाहेब रावसाहेब उगले हे दुचाकीवरून पुण्याला जात होता. नागझरी फाट्याजवळ उगले यांना अडवून त्यांचा खून केला होता. या घटनेने जिल्हाभर खळबळ उडाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन व सध्याचे गेवराई ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी त्यावेळी या गुन्ह्याचा तपास केला होता. अवघ्या काही दिवसात गाड्या झरक्या चव्हाण याला बेड्या ठोकल्या होत्या. परंतु शहाद्या हा पोलिसांना गुंगारा देत होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. गेवराई तालुक्यातील रेवकी येथे शहाद्या आल्याची माहिती आहेर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ आपल्या टिमसह सापळा लावला. रात्रीच्या वेळी पाऊस पडत असतानाही त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. शहाद्याविरोधात गेवराई, चकलांबा, शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.  ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. दिनेश आहेर, पोउपनि अरविंद गटकुळ, भूषण सोनार, पोना गणेश तळेकर, नवनाथ गोरे, शरद बहिरवाळ, हनुमान जावळे, एकनाथ कांबळे, अमोल खटाणे, दत्ता चव्हाण यांनी केली.तर तो ना-यासोबतच पकडला असतासाधारण आठ ते दहा महिन्यांपूर्वी शहाद्याच्या टोळीतीलच नारायण पवार उर्फ ना-या याच्या रेवकी परिसरातच पावसात आहेर यांनी मुसक्या आवळल्या होत्या. यावेळी शहाद्या हा त्याच्या बाजूलाच म्हणजे काही अंतरावर झोपलेला होता. ना-या पकडताच त्याने अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले होते. हा प्रकार ना-याने चौकशीत सांगितला होता, असे सूत्रांकडून समजते.गंगावाडीत वस्तीवर केले हल्लेउगले यांचा खून करून पसार झाल्यानंतर काही दिवसांतच त्याने आपल्या इतर साथीदारांसह गेवराई तालुक्यातील गंगावाडी वस्तीवर नागरिकांवर हल्ले केले होते. त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली होती. शहाद्या रेवकीत आल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांना कल्पना देऊन तात्काळ टिमसह सापळा लावला. यामध्ये तो अडकला. मागील अनेक वर्षांपासून तो आम्हाला हवा होता. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्याची परिसरात दहशत होती. अखेर त्याला पकडण्यात यश आले.

टॅग्स :Beedबीड