शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार शौचालये बांधण्यास सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:39 IST

पायाभूत सर्वेक्षणानुसार बीड जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. मात्र अजूनही जवळपास चाळीस हजार कुटुंबांकडे स्वत:ची शौचालयाची सुविधा नाही. महाराष्टÑ रोजगार हमी योजनेतून येत्या १५ आॅगस्टपर्यंत निर्मल शौचालय निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम घ्यावी त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी केले.

ठळक मुद्देपुरुषोत्तम भापकर : सर्वेक्षणाबाहेरील शौचालये मनरेगातून बांधणार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पायाभूत सर्वेक्षणानुसार बीड जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. मात्र अजूनही जवळपास चाळीस हजार कुटुंबांकडे स्वत:ची शौचालयाची सुविधा नाही. महाराष्टÑ रोजगार हमी योजनेतून येत्या १५ आॅगस्टपर्यंत निर्मल शौचालय निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम घ्यावी त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी केले.स्वच्छ भारत मिशन विभागाच्या वतीने आयोजित स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण २०१८ या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपायुक्त पारस बोथरा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी, युनिसेफचे राज्य सल्लागार जयंत देशपांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे (वासो) अरुण रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भापकर यांच्या हस्ते स्वच्छता सर्वेक्षण लोगोचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी आयुक्त भापकर म्हणाले, जिल्ह्यात शौचालये बांधण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न केले. त्यामुळे जिल्हा १२ जानेवारी रोजी पायाभूत सर्वेक्षणाप्रमाणे हागणदारी मुक्त झाला. मात्र, सर्वेक्षणाबाहेरील चाळीस हजार शौचालय बांधण्याचे राहून गेले आहेत. ही शौचालये मनरेगा योजनेतून बांधली तर जिल्हा शंभर टक्के हागणदारीमुक्त होईल यासाठी गरजू कुटुंब शोधणे प्रस्ताव तयार करुन प्रशासकीय मान्यता देणे व कामास प्रारंभ करणे याकरिता विशेष मोहीम आखून येत्या १५ आॅगस्टपर्यंत सर्व शौचालये पूर्ण करण्याचे आवाहन भापकर यांनी यावेळी केले.ग्रामस्थांचा सहभाग मिळण्यासाठी देखरेख समिती स्थापन केली असून स्वच्छताग्रहींच्या मदतीने १ सप्टेंबरपर्यंत रोज ‘गुड मर्ॉनिंग’ करण्यात येणार असल्याचे येडगे म्हणाले.१३६५ गावांत अभियानस्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण अभियान जिल्ह्यातील १३६५ गावात एकाचवेळी सुरू करण्यात आले आहे. गावात अंगणवाडी, शाळा, धार्मिक स्थळे, बाजारतळ, स्वच्छ राहतील व त्या ठिकाणची शौचालये वापरात असावी या बाबी गृहित धरून केंद्र शासनाच्या वतीने गावांची तपासणी होणार आहे.

टॅग्स :Beedबीडcommissionerआयुक्त