शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

गेवराई तालुका पशुचिकित्सालय समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:39 IST

येथील तालुका पशुचिकित्सालय रिक्त पदांमुळे सलाईनवर आहे. ३ वर्षांपासून सहायक आयुक्त पद रिक्त आहे. प्रभारींवर पशुचिकित्सालयाचा गाडा हाकला जात आहे.

ठळक मुद्देप्रभारींवर पशुचिकित्सालयाचा कारभार : तालुक्यातील चौदा गावांतील १० हजार पशुधन आले धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : येथील तालुका पशुचिकित्सालय रिक्त पदांमुळे सलाईनवर आहे. ३ वर्षांपासून सहायक आयुक्त पद रिक्त आहे. प्रभारींवर पशुचिकित्सालयाचा गाडा हाकला जात आहे. अनेकवेळा पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुपालकांना खाजगी डॉक्टरांकडे जाऊन पशुंवर उपचार करावे लागत आहेत.गेवराई येथे सहायक आयुक्त पशुसंवर्धन अंतर्गत तालुका लघु पशू चिकित्सालय आहे. या चिकित्सालयांतर्गत तालुक्यातील गेवराई, धोंडराई, खळेगाव, मालेगाव, शिरसमार्ग, सिरसदेवी, भेंडटाकळी, टाकरवण, तिंतरवणी, निपाणी जवळका, पाचेगाव, पाडळसिंगी, दैठण, रेवकी, या चौदा गावातील पशुधनावर उपचार केले जातात, या चौदा गावांमध्ये साधारणत: १० हजारांच्या आसपास पशुधन आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या काळात शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी यासह इतर जनावरांना पोटफुगी, फऱ्या, घटसर्प आदी आजार उद्भवत असतात. या आजारात पशुधन दगावण्याची भीती अधिक असते. पावसाळयात जनावरांना होणारे आजार पाहता लसीकरण मोहीम राबविणे गरजेचे आहे. मात्र या चिकित्सालयातील पशुधन वैद्यकीय अधिकारी यांचे पद रिक्त आहे. यामुळे पशुंवर वेळेवर उपचार होत नाहीत. पशुचिकित्सालयात सहायक आयुक्त, पशुधन वैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, परिचर अशी पदे मंजूर आहेत. मात्र मागील तीन वर्षांपासून सहायक आयुक्तचे पद रिक्त आहे. तत्कालीन कार्यरत असलेले पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.बी.रनसकर सेवानिवृत्त झाल्यानंतर तीन वर्षांपासून प्रभारी अधिकाºयांवरच या पदाचा कारभार सुरू आहे. पशुधन पर्यवेक्षक, परिचर, ड्रेसर ही पदे रिक्त असल्याने पशुंना वेळेवर उपचार मिळत नाहीत. सध्या बीड येथील डॉ.एच.के. शेख प्रभारी पशुधन विकास अधिकारी यांच्यावर या चिकित्सालयाचा गाडा चालू आहे.शासकीय योजनांचाही लाभ मिळेनारिक्तपदांमुळे शासनाच्या दुधाळ संकरित गाई, म्हशी गट वाटप अनुजाती लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचे गट वाटप शेळी, मेंढी गट वाटप, मांसल पक्षी, कडबा कुटी यासह पशुसंवर्धन विभागाअंतर्गत येणाºया शासकीय योजनांपासूनही शेतकरी वंचित राहत आहेत.सोयी सुविधांची वानवापशुचिकित्यालयात सोयी सुविधांचीही मोठी वानवा आहे चिकित्सालयाच्या इमारतीसह शौचालयाची दुरवस्था झाली आहे. विजेचा अभाव असून जनावरांसाठी अथवा कार्यालयाच्या कामकाजासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. इमारतमध्ये भांगर जमा झाले असून, जनावरांना पोटदुखी झाल्यास पाण्यात मिसळून द्यायचे औषध तर पावसाच्या पाण्याने भिजले आहे, असे चित्र आहे.पदे भरण्यासाठी पाठपुरावायाबाबत पशुधन विकास अधिकारी श्रेणी १ एन.ए. सानप म्हणाले, मी पशुधन विकास अधिकारी श्रेणी १ म्हणून रूजू झालो असून, तालुक्यामध्ये सहायक आयुक्त पद १, वरिष्ठ लिपीक पद १, ड्रेसर १, पशुधन पर्यवेक्षक रिक्त ६, मंजूर १३ परिचर रिक्त ८ मंजूर पदे १३ आहेत. इत्यादी पदे रिक्त आहेत. वरील पदे भरण्यासाठी मी येण्याअगोदर पाठपुरावा केलेला असून, मी पण या बाबत वरिष्ठांना कळविण्यासाठी पाठपुरावा करेल, असे सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रBeedबीड