शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'आर्मीमधून बोलतोय...'; सैन्यात अधिकारी असल्याची थाप मारून व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 17:08 IST

फोनवरून बोलणाऱ्या भामट्यांवर विश्वास ठेवून व्यापाऱ्याने रक्कम ऑनलाईन पाठवली.

अंबाजोगाई ( बीड ) : मोबाईलवर संपर्क करुन आर्मीत अधिकारी असल्याची बतावणी करत एका भामट्याने अंबाजोगाई येथील एका गॅस व्यापाऱ्याची लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणात गॅस विक्रेत्याकडून तब्बल १ लाख ३५ हजार ४१५ रुपयाची रक्कम अनोळखी भामट्यांनी लंपास असून शहर ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे.

सध्या ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वेगाने वाढत चालले आहेत. कधी अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे सांगत तर कधी ओटीपी विचारुन घेत नागरिकांच्या बँक खात्यातून लाखोंच्या रकमा ऑनलाईन लांबवल्या जात आहेत. अशा चोरट्यांचा यंत्रणेलाही तपास लागणे आव्हानात्मक ठरू लागले आहे. असाच एक प्रकार अंबाजोगाईत समोर आला आहे. शहरातील अभय संजय पवार हे खासगी गॅस एजन्सी चालवतात. ८ सप्टेंबर रोजी त्यांना दोन अनोळखी क्रमांकावरुन कॉल आला. ‘मी आर्मीमधून बोलतोय, आमचा अंबाजोगाई येथे कॅम्प होणार आहे. त्यासाठी आम्हाला १५ व्यवसायीक गॅस कनेक्शन पाहिजेत. त्याचे पैसे आमच्या हेड ऑफीसवरुन रिफंड होतील असे फोनवरुन बोलणार्‍या अनोळखी व्यक्तीने पवार यांना सांगितले. 

हेही वाचा - गुरूंच्या विरहाने शिष्याने सोडले प्राण; समाधीस्थळीच घेतला अखेरचा श्वास

फोनवरून बोलणाऱ्या अनोळखी भामट्यांवर विश्वास ठेवून पवार यांनी ९ हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन पाठवली. त्यानंतरही संबंधीताने काम चालू आहे असे सांगत वेळोवेळी एकुण १ लाख ३५ हजार ४१५ रुपये पाठवण्यास भाग पाडले. ही रक्कम पाठवल्यानंतर पवार यांना कसलाही रिफंड मिळाला नाही. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी १० सप्टेंबर रोजी शहर ठाण्यात फिर्याद नोंदवली. यावरुन अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे. पो.नि.बाळासाहेब पवार अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - दिवट्या मुलाचा प्रताप; मृत वडिलांची बनावट सही करून ६५ लाखांवर डल्ला

टॅग्स :BeedबीडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी