शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बीडमधील स्वातंत्र्यसैनिक बोगस प्रमाणपत्र प्रकरण; ‘लोकमत’च्या वृत्तानंतर मलेरीया विभागातील ते सहा कर्मचारी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:22 IST

स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नसतानाही खोटी कागदपत्रांच्या आधारे स्वातंत्र्यसैनिक असल्याचे गौरव पत्र मिळवून लाभ मिळवले

बीड :  स्वातंत्र्य सैनिक असल्याचे भासवून खोटे प्रमाणपत्र काढत नौकरी बळकावणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवायांचा धडाका सुरू आहे. जिल्हा रूग्णालया पाठोपाठ आता मलेरिया विभागातील त्या सहा कर्मचाऱ्यांवरही बडतर्फची कारवाई करण्यात आल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून कारवाई रखडल्याचे समोर आणले होते. याबाबत ‘मलेरिया विभागातील त्या सहा कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार’ या मथळ्याखाली वृत्तही प्रकाशित केले होते.

स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नसतानाही खोटी कागदपत्रांच्या आधारे स्वातंत्र्यसैनिक असल्याचे गौरव पत्र मिळवून त्या आधारे जिल्ह्यातील शेकडो जणांनी निवृत्ती वेतनाचा लाभ मिळवल्याचे प्रकरण  बीड जिल्ह्यात समोर आले होते. ही बाब शासनाच्या निदर्शनास येताच त्यांनी कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानंतर हे कर्मचारी न्यायालयात गेले. मात्र न्यायालयाने ही बाब गंभीर असून अधिकाऱ्यांनीच आपल्या स्तरावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे जिल्हा रूग्णालयाच्या अस्थापनेवरील वर्ग ३ च्या ३ कर्मचाऱ्यांवर लातुरच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. अशोक माले यांनी आणि वर्ग ४ चे १७ कर्मचारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी बडतर्फ केले होते. त्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

आता जिल्हा रूग्णालया पाठोपाठ मलेरिया विभागातीलही सहा कर्मचाऱ्यांना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे यांनी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. एस.एम साखरे, एस.यु. बांगर. एम. पी. नांगरे, बी.बी. राख, एस.आर.वनवे, जी.एस. वनवे अशी बडतर्फ झालेल्या सहा कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 

टॅग्स :BeedबीडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी