शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी अपघातात १३ महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 23:54 IST

परतूर (जि. जालना) येथे जैन मुनींचे दर्शन घेऊन परत येत असलेल्या माजलगाव येथील महिलांच्या चारचाकी गाडीला अपघात होऊन तेरा महिला जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देखरात आडगाव फाट्यावर घडली घटना : परतूर येथे दर्शनासाठी गेल्या होत्या महिला

माजलगाव : परतूर (जि. जालना) येथे जैन मुनींचे दर्शन घेऊन परत येत असलेल्या माजलगाव येथील महिलांच्या चारचाकी गाडीला अपघात होऊन तेरा महिला जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.माजलगाव येथील तेरा महिला एका चारचाकीमधून परतूर येथे गुरुवारी सकाळी जैन मुनींचे दर्शनासाठी गेल्या होत्या. तेथून पाथरी येथील साईबाबांचे दर्शन घेतले व सायंकाळी माजलगाव कडे परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खरात आडगाव फाट्यावर चारचाकीच्या समोर चालणाऱ्या एका टेंपोने अचानक ब्रेक लावल्याने चारचाकी त्यावर पाठीमागून आदळली. यामध्ये चारकाकीच्या काचा फुटल्या व ती बाजूच्या झाडावर आदळली.या अपघातात चारचाकीमध्ये असलेल्या संतोषी रमेश ओस्तवाल, राजकुंवर रेदासणी, सपना किशोर दुगड, कल्पना संतोष मुगडीया, उज्वला संजय रेदासणी, पद्मा रेदासणी, रेणुका सुशील लोढा, वंदना दिलीप ललवाणी, प्रमिला शांतीलाल दुगड यांच्यासह १३ महिला जखमी झाल्या आहेत.हा अपघात अचानक झाल्यामुळे महिलांच्या तोंड, हात पायांना जखमा होऊन मुका मार लागला आहे. तर चालक बाबासाहेब नागापूरकर देखील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तात्काळ फाट्यावरील नागरिकांनी जखमींना खाजगी वाहनातून माजलगाव येथील विविध रुग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी जखमींच्या नातेवाईकानीं मोठी गर्दी केली होती.दरम्यान अपघातातील टेंपोचालक त्याठिकाणी न थांबता भरधाव टेम्पो घेऊन निघून गेला. त्या टेम्पो चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात