शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
4
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
5
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
6
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
7
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
8
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
9
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
10
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
11
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
12
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
13
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
14
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
15
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
16
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
17
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
18
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी
19
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
20
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...

बीडमध्ये एकाच रात्रीत चार चो-या; लाखोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:31 IST

बीड शहरातील सारडानगरीत बंद घराचे कुलूप तोडून एक चोरी केली तर दोन ठिकाणी अयशस्वी प्रयत्न झाला. तसेच विद्यानगर भागात एका एलआयसी अधिकाºयाच्या घरी चोरी करून लाखोंचा ऐवज लंपास केला.

बीड : शहरातील सारडानगरीत बंद घराचे कुलूप तोडून एक चोरी केली तर दोन ठिकाणी अयशस्वी प्रयत्न झाला. तसेच विद्यानगर भागात एका एलआयसी अधिकाºयाच्या घरी चोरी करून लाखोंचा ऐवज लंपास केला. या सर्व घटना सोमवारी रात्री घडल्या. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरांनी पोलिसांना एक प्रकारे खुले आव्हानच दिले आहे. या घटनांनी शहरात खळबळ उडाली आहे.

सारडानगरीतील तीनही चो-या या कुलूपबंद घरात झाल्या आहेत. जयप्रकाश चरखा हे आपल्या भावाकडे झोपण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. चोरट्यांनी नगरीत मागच्या संरक्षक भिंतीवरून प्रवेश करीत चरखा यांच्या घराचे कुलूप तोडून चांदीचे शिक्के व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला.

त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा रवींद्र कुलकर्णी यांच्या बंद घराकडे वळविला. परंतु घरात त्यांना काहीच सापडले नाही. येथे अपयश आल्यानंतर चोरटे अभिषेक देशपांडे यांच्या बंद घराकडे गेले. त्यांच्याही घराचे कुलूप तोडून त्यांनी आतप्रवेश करीत कपाट व इतर सामानाची उचकापाचक केली. परंतु त्यांना हाती काहीच लागले नाही. या चोºया करण्यापूर्वी बाजूच्या घरांच्या कड्या बाहेरून लावण्यात आल्या होत्या. हे शेजारी सकाळी उठल्यावर घर उघडण्यास गेले. परंतु घर बाहेरून बंद असल्याचे समजले. त्यांनी आरडाओरडा केला असता चोरीचे प्रकार निदर्शनास आले. घटनेची माहिती समजताच शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी धाव घेतली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनीही भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शहर ठाण्यात नोंद करण्यात आली.दुसरी घटना शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील विद्यानगर (प.) भागात घडली. एलआयसी अधिकारी प्रशांत सक्सेना हे आजारी असल्याने त्यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व कुटूंब पुण्यालाच होते. मंगळवारी पहाटे त्यांच्या पत्नी अमृता सक्सेना या बीडला आल्या. अपार्टमेंटमध्ये वर जात असतानाच त्यांना पायºयावर आपल्या घराचे कुलूप पडलेले दिसले. त्यांनी घराकडे धाव घेतली असता आपल्या घरात चोरी झाल्याचे दिसले. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एक लाख ३० हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. शिवाजीनगर ठाण्यात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे.एसपींची दोन्ही ठाण्यांना भेटएकाच रात्री चार चोºया झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी बीड शहर व शिवाजीनगर पोलीस ठाण्याला भेट देऊन तात्काळ तपास लावण्याचे आदेश दिले.अंभोरा चोरी प्रकरणाचा तपास सुरू असताना बीडमधील माहिती समजल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी दुपारी सर्व ठिकाणी भेटी दिल्या. त्यांच्यासोबत सपोनि दिलीप तेजनकर, सचीन पुंडगे दरोडा प्रतिबंधकचे सपोनि श्रीकांत उबाळे यांच्यासह कर्मचारी हजर होते.