कारखान्यातील चोरी प्रकरणाचा परळी ग्रामीण पोलिसांनी छडा लावला. यात एकूण सात आरोपींना अटक केली. त्यांना परळी न्यायालयात हजर केले असता, आरोपींना २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा सात आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ करून तिघांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यातील ३७ लाखांच्या चोरी प्रकरणाचा तपास सुरू आहे. पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या गोदामातील ३७ लाख रुपये किमतीचे विविध साहित्य चोरून नेल्याची घटना ऑक्टोबरमध्ये घडली. याप्रकरणी २२ डिसेंबर रोजी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कारखान्याच्या लिपिकाने फिर्याद दाखल केली आहे. आरोपीकडून मुद्देमाल जप्त करणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.
वैद्यनाथ कारखान्यातील चोरीप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:43 IST