शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

हरीण शिकार प्रकरणी आष्टीत वन विभागाने दोघांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 09:47 IST

पथकाने आरोपींकडून मांसही केले जप्त

कडा (बीड ) -  सोमवारी रात्री दहाच्या सुमारास सोलापूरवाडी या भागात हरणाच्या कळपावर हल्ला करत एका हरणाची शिकार केल्याप्रकरणी आष्टी येथील वनविभागाने दोघाजणांना मांसासह ताब्यात घेतले आहे. अर्जुन सोनबा कुऱ्हाडे, विठ्ठल किसन खुडे असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नावे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील पिंपळा सोलापुरवाडी या रस्त्यावरून सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हरणाचा कळप जात होता. यातील एका हरणाला जखमी करून त्यांची खाण्यासाठी शिकार केली जात असल्याची माहिती ग्रामस्थानी अंभोरा पोलिसांना दिली.पोलिसांनी वनविभागाला याबाबत कळवले असता त्यांच्या पथकाने लागलीच त्या भागात धाव घेतली. यावेळी अर्जुन सोनबा कुऱ्हाडे, विठ्ठल किसन खुडे यांची चौकशी केली असता त्यांच्या घराच्या समोर हाॅटेलवजा पत्र्याच्या शेडमध्ये हरणाची शिकार करून त्याचे मांस एका जागेवर ठेवल्याचे निदर्शनास आले. पथकाने दोघांना ताब्यात घेत मांस जप्त केले असून गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई आष्टी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे, वनपाल सुभाष धसे , महाजन टी.एम. वनरक्षक बाबासाहेब शिंदे, युनुस शेख, सोनकांबळे, जगताप, मालेवार यांच्या पथकाने केली.

हरणाला चारचाकीने उडवल्याचा बनाव पत्र्याच्या शेडमध्ये पथकाने जाऊन पाहणी केली असता या हरणाला एका चारचाकी गाडीने उडवले यात ते मरण पावले असा बनाव आरोपींनी केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकBeedबीड