शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘मन की बात’साठी मजूर रोजगार बुडवून बसले; संवाद न साधताच फोटो दाखवल्याने पदरी निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 13:32 IST

नरेंद्र मोदी ‘मन की बात’ मध्ये कड्यातील मजुरांशी करणार होते संवाद

कडा (जि.बीड) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ कार्यक्रमात राज्यातून बीड जिल्ह्यातील कडा येथे मजुरीसाठी आलेल्या कामगारांशी चर्चा करणार असल्याने सकाळी दहा वाजल्यापासून महावितरण कार्यालयाजवळ नागरिकांची गर्दी झाली होती. परंतु, ‘मन की बात’ ऐकायला आलेल्या जनता जनार्दनाची निराशा झाली.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथे मागील अनेक वर्षांपासून शेती कामासाठी जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील मजूर पालात राहात आहेत. त्या मजुरांच्या व्यथा व जीवन जगताना ते करत असलेला संघर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर देशमुख यांनी मांडला होता. त्याची दखल घेत २४ एप्रिल रोजी रोजी देशातील अकरा राज्यांतून महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील कडाचा समावेश ‘मन की बात’ कार्यक्रमात करण्यात आला होता. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता सुरू होऊन ११:३४ला संपला. यावेळी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. विधान परिषदेचे आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमसेन धोंडे, भाजप नेते राजेंद्र म्हस्के, अशोक साळवे, अमोल तरटे, अनिल ढोबळे आदी यावेळी उपस्थित होते.

रोजगार बुडाला, पदरी निराशाचतुमच्या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐकून घेणार आहेत. रविवारी सकाळी ‘मन की बात’ कार्यक्रमात तुमच्याशी संवाद साधणार असल्याचे आम्हाला शनिवारपासूनच सांगितले होते. आम्ही १४ कुटुंबांतील लोक रविवारी सकाळपासून कामावर न जाता थांबलो होतो. पण त्या स्क्रीनवर फक्त आम्ही बसलेले दृष्य दिसले. आमच्याशी संवाद साधला नाही. रोजगाराचे काम सोडून थांबवले. पण काहीच बोलणे झाले नसल्याने आमची निराशा झाल्याचे येथील कामगार सर्जेराव शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :BeedबीडMan ki Baatमन की बातprime ministerपंतप्रधान