शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

पाच गावांमध्ये १५८४ व्यक्तींनी भरला अधिकच्या क्षेत्रावर विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 18:52 IST

पीकविमा भरताना बोगसगिरी उघड

ठळक मुद्देसर्वेक्षणात समोर आला प्रकार  बोगसगिरी केल्यामुळे इतर शेतकऱ्यांना बसतो फटका  

बीड : पीक विमा योजनेत विमा कंपनीकडून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत तसेच शेतकऱ्यांची फरपट केली जात आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील ५ गावांमध्ये केलेल्या सॅम्पल सर्वेक्षणात काही लोकांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत बोगसगिरी केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील  पाच गावांत आठ अ प्रमाणे कमी क्षेत्रफळ असताना देखील जास्तीच्या क्षेत्रफळावर पिकविमा भरला आहे तर ज्यांना शेतीच नाही अशा १६८६ पीक विमा भरल्याचे समोर आले आहे. अशा लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

बीड जिल्ह्यातील काही भागात पीक विमा योजनेचा गैरफायदा घेण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पाच गावात सॅम्पल सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार घाटनांदूर , अंबाजोगाई (ग्रामीण ), बदार्पूर , पूस आणि पट्टीवडगाव ही मोठ्याप्रमाणात विमा भरलेलेली गावे निवडण्यात आली होती. या गावातील विमा भरलेल्या प्रत्येक खातेदाराचे क्षेत्रनिहाय सर्वेक्षण करण्यात आले. यात काही ठिकाणी सुरु असलेली बोगसगिरी समोर आली आहे. अंबाजोगाईचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. 

घटनांदूर २४३, अंबाजोगाई ग्रामीण ९५६, बर्दापूर २३०, पट्टीवडगाव २१७ , पूस ३६ इतक्या व्यक्तींनी विमा भरला. मात्र त्यांच्या नावे शेत जमीन असल्याचे सर्वेमध्ये उघड झाले आहे. त्याच प्रमाणे याच ५ गावांमध्ये १५८४ शेतकऱ्यांनी क्षेत्रापेक्षा जास्त विमा भरल्याचे समोर आले आहे. घटनांदूर, पट्टीवडगाव आणि पूस या गावांमध्ये लागवडीयोग्य क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रात विमा भरण्यात आला असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बोगसगिरी केल्यामुळे इतर शेतकऱ्यांना बसतो फटका  पीकविमा योजनेतून गैरप्रकार करून लाभ घेतल्याचे समोर आल्यामुळे, जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांचा पीक विमा जाहीर झाला, मात्र परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात कंपनीने अद्याप विमा जाहीर केलेला नाही.विमा संरक्षित क्षेत्र वाढते. हे लागवडीयोग्य किंवा पेरणी झालेल्या क्षेत्रापेक्षा जास्त दिसून आले की नुकसानभरपाईची जबाबदारी टाळण्यासाठी विमा कंपनी सर्रास सर्वांनाच ह्यओव्हर इन्शुअरन्सह्ण च्या नावाखाली विमा नाकारते. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांना मात्र फटका बसतो.

कंपनीनेने केलेला सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हा प्रशासनस प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, मात्र, जास्तीचे क्षेत्र दाखवून किंवा शेती नसताना पीकविमा भरु नये असे प्रकार पुढे आले तर कायदेशीर कारवाई होऊ शकते    - रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी बीड  

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडCrop Insuranceपीक विमा