शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणी पाच आरोपींनी जन्मठेप

By admin | Updated: April 10, 2017 20:38 IST

खून का बदला खून म्हणत शिवसंग्रामचे कार्यकर्ते व माजी सरपंच उध्दव सुरवसे यांची हत्या करणाऱ्या पाच आरोपींना बीड न्यायालयाने जन्मठेपेची

 ऑनलाइन लोकमतबीड, दि. 10 - खून का बदला खून म्हणत शिवसंग्रामचे कार्यकर्ते व माजी सरपंच उध्दव सुरवसे यांची हत्या करणाऱ्या पाच आरोपींना बीड न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सोमवारी सुनावली. या प्रकरणातील उर्वरीत ११ आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. कुंभारी (ता.बीड) येथील शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते व माजी सरपंच उद्धव सुरवसे यांचा चार वर्षांपूर्वी खून झाला होता.

उद्धव सुरवसे व चाकरवाडीचे माजी उपसरपंच विनोद कवडे हे दोघे २० मार्च २०१३ रोजी बीडहून दुचाकी (क्र. एमएच २३ व्ही-७०७७) वरु न गावी निघाले होते. मांजरसुंबा- नेकनूर रस्त्यावरील गवारी फाट्याजवळ त्यांचा पाठलाग करत पाठीमागून आलेल्या कार (क्र. एमएच १४ सीएक्स- १७२)   ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. कवडे दुचाकी चालवित होते तर सुरवसे मागे बसले होते. अपघातानंतर दोघेही रस्त्याच्या डाव्या बाजूला पडले. त्यानंतर कारमधील पाच जणांनी खाली उतरून उद्धव सुरवसे यांच्यावर खंजीर, तलवार, कत्ती अशा धारदार शस्त्राने वार केले. यावेळी कवडे दुचाकीवरुन पडल्याने जखमी झाले होते. घटनास्थळापासून एक किमी अंतरावर सुरवसे यांचा  पेट्रोलपंप आहे. कवडे यांनी तेथे फोन करुन जीप बोलावून घेतली. जिल्हा रुग्णालयात उद्धव सुरवसे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.  उद्धव सुरवसे यांच्या हत्येमागे वेगवेगळे कांगोरे असल्याचे तपासात पुढे आले. ते कुंभारीचे माजी सरपंच होते. शिवाय नोव्हेंबर २०१२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा पॅनल विजयी झाला होता. २० ते २५ वर्षांपासून ग्रामपंचायतीतील त्यांचे वर्चस्व होते.  शिवाय १९९४ मध्ये महावीर सुरवसे यांचा खून झाला होता. त्यात मयत उद्धव सुरवसे, त्यांचे वडीलव भाऊ आरोपी होते; मात्र नंतर त्यांची निर्दोष सुटका झाली होती. या खुनाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी त्यांच्या खुनाचा कट शिजविला. घटनेच्या आदल्या दिवशी गावात त्यांनी पार्टी केली होती. एकमेकांशी त्यांचे मोबाईलवरुन सतत बोलणे होत असे, असेही तपासात निष्पन्न झाले होते.