शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

एसीबीच्या जाळ्यात ‘मासा’ गळाला ! १० हजारांची लाच घेताना मत्स्य विकास अधिकारी तुंबारे चतुर्भुज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 19:08 IST

मत्स्य व्यवसायायाचा ठेका आदेश देण्यासाठी व ठेका भरणा केलेल्या डी.डी. रकमेच्या पावत्या देण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेताना मस्त्य व्यवसायक विकास कार्यालयातील मत्स्य विकास अधिकारी बबन तुकाराम तुंबारे हा मोठा ‘मासा’ एसीबीच्या गळाला लागला.

ठळक मुद्देगेवराई तालुक्यातील बंगाली पिंपळा येथील शहादत मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था मर्या, बंगाली पिंपळगाव या संस्थेला तलावाचा ठेका देण्यासाठी मागण्यात आली लाच एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या या बड्या माशाकडे सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त  पदभार होता.

बीड : मत्स्य व्यवसायायाचा ठेका आदेश देण्यासाठी व ठेका भरणा केलेल्या डी.डी. रकमेच्या पावत्या देण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेताना मस्त्य व्यवसायक विकास कार्यालयातील मत्स्य विकास अधिकारी बबन तुकाराम तुंबारे हा मोठा ‘मासा’ एसीबीच्या गळाला लागला. आज दुपारी तीन वाजता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही कारवाई करण्यात आली.

गेवराई तालुक्यातील बंगाली पिंपळा येथील शहादत मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था मर्या, बंगाली पिंपळगाव या संस्थेला तलावाचा ठेका देण्यासाठी संबंधित तक्रारदार हा नियमाप्रमाणे सर्व कागदपत्रे घेऊन तुंबारेकडे रोज खेटे मारत होता. परंतु तो आज-उद्या करून चालढकल करीत असे. त्यानंतर त्याने ठेका आदेश देण्यासाठी २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. याची खात्री एसीबीकडून करण्यात आली.

यानंतर आज दुपारी तुंबारेने तक्रारदाराला १० हजार रूपये लाचेची मागणी केली व इच्छित स्थळी बोलावून ती स्वीकारली. याचेवळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकारी, कर्मचा-यांनी त्याला झडप घालून पकडले. रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्रीकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक गजानन वाघ, श्रीराम खटावकर, विकास मुंडे, सुशांत सुतळे, राकेश ठाकुर, सय्यद नदीम आदींनी केली.

भर उन्हात तक्रारदारच्या प्रतीक्षेततुंबारे हा वर्ग दोनचा अधिकारी आहे. शर्टिंग, बुट असा टापटीप होऊन त्याने तक्रारदाराला तात्काळ शिवाजी चौकात पैसे घेऊन बोलविले. एसीबीने त्याप्रमाणे ‘जाळे’ टाकले होते. बसस्थानकाच्या बाजूने जाणा-या नवीन झालेल्या सिमेंट रस्त्यावर तो तक्रारदारची भर उन्हात प्रतीक्षा करीत होता. तक्रारदाराकडून लाच स्वरूपात दहा हजार रूपये स्विकारताच एसीबीने टाकलेल्या जाळ्यात तो अलगद पडला. या बड्या ‘माशाने’ यापुर्वीही अनेकांकडून लाच स्वरूपात लाच स्वीकारल्याचे बोलले जात आहे. परंतु केवळ तक्रार नसल्याने तो यामध्ये यशस्वी झाला. अखेर गुरुवारी हा मासा जाळ्यात अडकला.

सहायक्त पदाचा पदभारही तुंबारेकडेचएसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या या बड्या माशाकडे सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त  पदभार होता. त्यामुळे कार्यालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे छोटे-मोठे काम असले तरी हा तुंबारे त्यांच्याकडून लाचेची मागणी करीत असे, असे समजते. त्याच्या लाचखोरीला मत्स्य व्यवसायीक आणि ठेकेदार वैतागले होते.

टॅग्स :Beedबीड