शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

उपद्रवींवर प्रतिबंध केल्याने प्रथमच निवडणूक ‘निर्विघ्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:16 IST

जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुका नेहमीच चर्चेत असतात. यावेळीही बीड लोकसभा निवडणूक चर्चेत राहिली. यावेळी मतदानाच्या दिवशी कसलाही गडबड गोंधळ न होता निर्विघ्नपणे ही प्रक्रिया शांततेत पार पडली.

ठळक मुद्देबीड लोकसभा निवडणूक : २०१४ ला २८ गुन्हे, यावेळेस मात्र किरकोळ २ घटना

बीड : जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुका नेहमीच चर्चेत असतात. यावेळीही बीड लोकसभा निवडणूक चर्चेत राहिली. यावेळी मतदानाच्या दिवशी कसलाही गडबड गोंधळ न होता निर्विघ्नपणे ही प्रक्रिया शांततेत पार पडली. मागील महिनाभरपासून पोलिसांनी केलेले नियोजन आणि उपद्रवींवर केलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांमुळे हे शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत २८ गुन्हे दाखल झाले होते. यावेळेस मात्र किरकोळ २ घटना घडल्या आहेत. यावरून निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था सुरळीत व शांततेत पार पडल्याचे स्पष्ट होते. जाणकारांच्या माहितीनुसार असे पहिल्यांदाच घडल्याचे सांगण्यात येते.बीड जिल्ह्यातील राजकारणाची राज्यभर चर्चा होते. यावेळीही ही चर्चा कायम होती. राजकीय चर्चा होत असली तरी प्रशासनाकडूनही ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अर्ज दाखल करण्यापासून ते मतमोजणीपर्यंतचे सर्व नियोजन करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील एक प्रकार वगळता ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. दरम्यान, निवडणूक काळात आचारसंहिता भंगाचे दोन आणि इतर तीन असे पाच गुन्हे दाखल झाले. मात्र, मतदानाच्या दिवशी गुन्हा घडू न देता दप्तर कोरे ठेवण्यात पोलिसांना यश आले. अंबाजोगाई ग्रामीण ठाणे हद्दीत मद्यपीने घातलेला गोंधळ आणि नेकनूर ठाणे हद्दीत झालेली शिवीगाळ हे अपवादात्मक किरकोळ प्रकार सोडले तर मतदान शांततेत झाले.दरम्यान, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सर्व ठाणेदारांची बैठक घेतली. सर्व उपद्रवी, गुन्हेगारांची यादी मागविली. त्यांच्या गुन्ह्यांनुसार त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया, एमपीडीए, हद्दपारीसारख्या कारवाया केल्या. यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण झाला होता. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्यासह अपर अधीक्षक विजय कबाडे, अजित बोºहाडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणे प्रमुख यांनी तत्पर केलेला बंदोबस्त, यामुळेच मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे सांगण्यात आले.पोलिसांचे नियोजन : पहिली फेरी फत्ते; दुसरी फेरी २३ मे रोजीबीड पोलिसांच्या माहितीनुसार ८ एप्रिलपर्यंत जुगार, दारूसह इतर गुन्हे करणाऱ्या ११ टोळ्यांमधील ५६ गुन्हेगारांवर मपोका ५५ व ५६ नुसार हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच अवैध शस्त्र बाळगणाºया ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.३ अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई करून त्यांना स्थानबद्ध केले आणि औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात त्यांची रवानगी केली.दारूबंदी व जुगार अड्डयांवरही धाडी टाकल्या. यामध्ये दारूबंदीच्या ५५१ केसेस करून ४६ हजार ४०९ लिटर म्हणजेच १६ लाख ५६ हजार ५७० रूपयांची दारू जप्त केली आहे.७० जुगार अड्डयांवर धाडी टाकून ११२६ आरोपी ताब्यात घेत त्यांना न्यायालसमोर हजर करण्यात आले आहे. ११२६ आरोपींना अजामीनपत्र वॉरन्टही बजावण्यात आले आहेत.पाहिजे/फरारी असलेल्या १०४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने ३२१७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.याबाबरोबरच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाला सोबत घेऊन ६ ठिकाणी तर पोलिसांच्या विविध तुकड्या घेऊन ४ अशा जिल्ह्यात १० ठिकाणी पथसंचलन करण्यात आले आहे. तसेच दंगल नियंत्रणाची रंगीत तालीमही करण्यात आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडPoliceपोलिसVotingमतदान