शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

५३ वर्षांत प्रथमच १० दिवसांआड परळीला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:55 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या नागापूर वाण मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. जोत्याखाली पाणी आले आहे.

ठळक मुद्देनागापूरचे वाण प्रकल्प कोरडेठाक। शहरात पालिकेकडून ३० टँकद्वारे पाणीपुरवठा

संजय खाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या नागापूर वाण मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. जोत्याखाली पाणी आले आहे. १९६६ मध्ये धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गेल्या ५३ वर्षांत यंदा पहिल्यांदाच वाण प्रकल्प कोरडाठाक पडल्यात जमा झाला आहे. त्यामुळे परळी नगर परिषदेवर १० दिवसांआड पाणी पुरविण्याची प्रथमच वेळ आली. मात्र रमजान सणामुळे १० ऐवजी आठ दिवसांआठ पुरवठ्याचा निर्णय झाला.१९६१ मध्ये पाटबंधारे विभागाने नागापूरच्या धरणाचे बांधकाम सुरू केले व ते काम १९६६ मध्ये पूर्ण झाले. या धरणाची एकूण लांबी २,८०६ मीटर, तर सांडव्याची एकूण लांबी ६१८ मीटर आहे. उंची २०.३० मीटर आहे. धरणातील पाणी साठ्याची उंची १९ मीटर आहे.या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये नागापूर, माळहिवरा, मांडेखेल, तळेगाव, पांगरी, तडोळी, भिलेगाव, परचुंडी, लिंबोटा व इतर काही गावांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने शेतीसाठी पाणी पाटबंधारे विभागाने बंद केले आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासही या धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.परळीची लोकसंख्या १ लाखावर असल्याने पाणी टंचाई भासू नये म्हणून नगर परिषदेच्या वतीने ३० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टँकरसाठी पाणी चांदापूर रोडवरील वैयक्तिक मालकीच्या २ बोअरमधून घेण्यात येत आहे. शहरात नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचे कामही २०११ पासून चालू आहे. काही वस्त्यांत या योजनेतून पाणी मिळत आहे. शहरातील बोअरच्या पाण्याची पातळी घटली आहे, तर काही बोअर आटले आहेत.नवीन वस्त्यांमध्ये नगर परिषदेच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा करून पाणी टंचाईवर मात केली जात असल्याचे पाणीपुरवठा सभापती प्राजक्ता श्रीकृष्ण कराड म्हणाल्या.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई