शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या जिल्हा रूग्णालयात कोराेनाबाधित महिलेवर म्युकरमायकोसिसची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 17:07 IST

१५ दिवस उपचार घेत कोरोनामुक्त होऊन घरी परतली. परंतू मागील आठवडाभरपासून तिला त्रास सुरू झाल्याने ती जिल्हा रूग्णालयात दाखल झाली. तिचा सीटी स्कॅन केला असता म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसली.

बीड : येथील जिल्हा रूग्णालयात पहिल्यांदाच म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया (दुर्बिनद्वारे) शनिवारी दुपारी यशस्वी पार पडली. यापूर्वी अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात म्युकरमायकोसिसवर शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया झालेल्याचा दोन दिवसांपूर्वीच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

वडवणी तालुक्यातील ६५ वर्षीय महिला १४ एप्रिल रोजी कोरोनााबाधित आढळल्याने लोखंडी सावरगाव येथील रूग्णालयात दाखल झाली. १५ दिवस उपचार घेत कोरोनामुक्त होऊन घरी परतली. परंतू मागील आठवडाभरपासून तिला त्रास सुरू झाल्याने ती जिल्हा रूग्णालयात दाखल झाली. तिचा सीटी स्कॅन केला असता म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसली. त्यामुळे तिच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी तिची अँटिजन चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. परंतू तरीही शनिवारी दुपारी या महिलेला शस्त्रक्रिया गृहात घेण्यात आले. सुरूवातीला इन्डोस्कोपीक सायनस डिब्राईडमेंट ही शस्त्रक्रिया सुरू केली. परंतू तरीही संसर्ग जास्त असल्याने आणखी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. बीडमध्येच शस्त्रक्रिया आणि उपचार मिळत असल्याने सामान्यांना दिलासा मिळत आहे.

या टिमने घेतले परिश्रमजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.अशोक हुबेकर, डॉ.आय.व्ही.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सचिन कोल्हे, डॉ.सुधाकर बीडकर, डॉ.अभिषेक जाधव, डॉ.मिनाक्षी साळुंके, डॉ.साेमनाथ वाघमारे, परिसेविका जयश्री उबाळे, वैशाली सपकाळ, अधिपरिचारीका मिता लांबोरे, महेंद्र भिसे, वर्षा कुलकर्णी, कक्षसेवक संदीप बामने यांनी परिश्रम घेतले. यावेळी डॉ.सचिन आंधळकर, डॉ.महेश माने, डॉ.रामेश्वर आवाड यांचीही उपस्थिती होती. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या डॉ.उज्वला गावडे, संदीप साऊत, बाळासाहेब खळगे यांनीही शस्त्रक्रियासाठी नियोजन केले.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड