शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये आढळला 'डेल्टा'चा पहिला रूग्ण; राज्यातील रूग्णसंख्या ४५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 13:28 IST

Corona Virus Delta Variant : विषाणूने आपली जनूकीय रचना बदलत राहणे, हा विषाणूचा नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग आहे. यासंदर्भात जनतेने कोणतीही भीती न बाळगता कोरोना नियमांचे पालन करावे.

ठळक मुद्देजनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणातून शोधला रूग्ण

- सोमनाथ खताळ

बीड : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तोच आता कोरोना विषाणूच्या जनुकीय संरचनेत बदल होऊन डेल्टा प्लस आला आहे. याचा एक रूग्णही बीडमध्ये नोंदवला गेला आहे. परंतू याबाबत अद्यापही बीड जिल्हा प्रशासन अथवा आरोग्य विभागाला अधिकृत कसलीच माहिती प्राप्त झालेली नाही. असे असले तरी राज्याच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत दिलेल्या माहितीत बीडमध्ये एक रूग्ण असल्याचे सांगितले आहे. तसेच राज्यातील एकूण रूग्णसंख्या ४५ झाल्याचीही नोंद आहे.

महाराष्ट्र शासनाने जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणास गती मिळावी, यासाठी कौन्सिल ऑफ सांयटिफिक ॲंड इंडस्ट्रियल रिसर्च संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲंड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेसोबत करार केलेला आहे. या नेटवर्कद्वारे प्रत्येक महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून १०० नमुने तपासले जातात. बीड जिल्ह्यातूनही अंबाजोगाईच्या स्वाराती प्रयोगशाळेतून आतापर्यंत ३०० नमुने पाठविण्यात आल्याची माहिती आहे. यात एक रूग्ण निष्पन्न झाल्याची नोंद राज्याच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाकडे झाली आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, विषाणूने आपली जनूकीय रचना बदलत राहणे, हा विषाणूचा नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग आहे. यासंदर्भात जनतेने कोणतीही भीती न बाळगता कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

बीड आरोग्य विभाग अनभिज्ञया रूग्णाबद्दल बीडच्या आरोग्य विभागाकडे अद्यापर्यंत कसलीच अधिकृत माहिती आलेली नाही. जिल्हा रूग्णालयाचे डॉ.बाबासाहेब ढाकणे यांनीही आपल्याकडे काहीच अधिकृत माहिती नसल्याचे सांगितले. नियंत्रण कक्षातील साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनीही अद्याप अधिकृत ई-मेल आला नसल्याचे सांगितले. परंतू राज्याकडून एक मेसेज मिळाला असल्याचे ते म्हणाले. यावरून याबाबत आरोग्य विभाग अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यात ४५ रूग्णांची नोंदया जनुकिय क्रमनिर्धारण तपासणीतू राज्यात ८० टक्केहून अधिक नुमण्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळत असल्याचे सांगण्यात आले. या सर्वेक्षणातून राज्यात आतापर्यंत ४५ डेल्टा प्लसचे रूग्ण आढळले आहेत. यात जळगाव १३, रत्नागिरी ११, मुंबई ६, ठाणे ५, पुणे ३ आणि पालघर, सिंधुदूर्ग, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, कोल्हापूर आणि बीडमध्ये प्रत्येकी एका रूग्णाची नोंद आहे.

मी संबंधित विभाग प्रमुखांना बोललो आहे. आपल्याकडून नमुने गेलेले आहेत. परंतू त्याचा अहवाल आम्हाला प्राप्त होत नाही. तो थेट आरोग्य मंत्रालयात पाठविला जातो. त्यामुळे याबाबत अधिकृत काहीच सांगता येत नाही.- डॉ.शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता स्वाराती वैद्यकीय महा. अंबाजोगाई

टॅग्स :Beedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्या