शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात ८ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 15:01 IST

शासकीय, खाजगी डॉक्टर, परिचारिका, आशाताई, कर्मचाऱ्यांचा समावेश

ठळक मुद्देआरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती संकलन गतीने 

बीड :  कोरोनाची रुग्णसंख्या आणि भिती कमी होत असल्याचे दिसत आहे. जागतिक पातळीवर कोरोना प्रतिंधासाठी लस तयार करण्यात येत आहे. पुढील काही महिन्यात ती प्रत्यक्षात देण्यातही येणार आहे. याचा पहिला मान या लढ्यात सर्वात पुढे होऊन काम करणाऱ्या आरोग्य विभागातील योद्धांना असणार आहे. जिल्ह्यात खाजगी व शासकीय असे जवळपास साडे सात ते आठ हजार अधिकारी, कर्मचारी आहेत. 

या सर्वांची माहिती संकलीत करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. राज्य शासनाच्या सुचनेनुसार संबंधितांची माहिती जमा केली जात असल्याचे सांगण्यात आले.

कोरोना परतीच्या मागार्वरमागील काही दिवसांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. सध्या एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजार ५९१ असली तरी ॲक्टीव्ह बाधितांची संख्या हजाराच्याखाली आल्याने दिलासा मिळाला आहे.

लस येईल तेव्हा...लस कधी येणार हे अद्याप निश्चीत नसले तरी ती लवकरच येण्याचे संकेत आहेत. लस आल्यानंतर पहिला मान आरोग्य कर्मचाऱ्यांना असेल. त्यानंतर नागरिकांनाही दिली जाणार असल्याचे समजते. लस येताच आरोग्य विभागाने ती प्रत्येकाला मिळेल, याचे नियोजन करावे.

कोणाला मिळणार लस?शासकीय कर्मचारी : डाॅक्टर, नर्स, आशाताई, अंगणवाडी सेविका यांना कोरोना लस पहिल्यांदा दिली जाणार आहे. जिल्हाभरात यांची संख्या जवळपास सहा ते साडेसहा हजारापर्यंत आहे. त्या सर्वांची माहिती संकलीत केली जात आहे. दुसऱ्या टप्यात पोलीस, महसूल, पत्रकार, शिक्षक यांनाही ही लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

खासगी कर्मचारी : जिल्हयात ४८४ खाजगी रुग्णालये आहेत. त्यांच्याकडे  अधिकृत नोंदणी असलेले जवळपास एक ते दीड हजार कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा स्तरावर काय तयारी सुरू आहे?आरोग्य केंद्र, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांसह खाजगी रुग्णालये, सर्व आरोग्य संस्थांकडून माहिती संकलीत केली जात आहे. संस्था प्रमुखांकडून कर्मचाऱ्यांचा पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड आदिंची माहिती जमा केली आहे. खाजगी डॉक्टरांना पत्र देऊन त्यांच्या कर्मचाऱ्यांचीही यादी मागविली जात आहे. सर्व माहिती जमा करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली असून त्यांना गतीने संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना लसीच्या अनुषंगाने शासकीय व खाजगी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती संकलीत केली जात आहे. जिल्हयात जवळपास साडे सात ते आठ हजार लोक आहेत. आठवडाभरात सर्व माहिती जमा होईल. - डॉ.आ.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड