शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

करंजवन येथे गोळीबार, पिस्टल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:46 IST

पाटोदा तालुक्यातील करंजवन येथे सैन्यातील नौकरी सोडून आलेल्या एका माजी सैनिकाने सोमवारी रात्री उशिरा गोळीबार केला होता.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांनी दिली भेट : रात्री उशिरा दोघांवर गुन्हा दाखल

बीड : पाटोदा तालुक्यातील करंजवन येथे सैन्यातील नौकरी सोडून आलेल्या एका माजी सैनिकाने सोमवारी रात्री उशिरा गोळीबार केला होता. यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान गोळीबार करणाऱ्यांकडून पिस्टल हस्तगत केले असून, याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला.करंजवन येथे डोंगरेश्वर संस्थान महादेवाचे मंदिर आहे. श्रावणी सोमवार असल्यामुळे मोठ्या संख्येने ग्रामस्थ दर्शनासाठी गेले होते. त्याच ठिकाणी केळी वाटप करण्यात येत होती यावेळी हातातून प्रसाद पडल्याच्या कारणावरुन सागर तात्यासाहेब गर्जे व खाडे या दोघांशी आरोपी राजू चांगदेव खाडे व दादा चांगदेव खाडे यांचा वाद झाला होता. यापुर्वी देखील त्यांच्यात वाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, सोमवारी ३ वाजण्याच्या सुमारास यातील सैन्यातील नौकरी सोडलेल्या खाडे यांने पिस्टलमधून गोळीबार केल्याची घटना घडली होती. यामध्ये कोणीही जखमी झाले नव्हते. दरम्यान संबंधित पोलीस ठाण्याकडून ही अफवा असल्याचे देखील सांगण्यात आले होते. मात्र, गोळीबार झाल्याची चर्चा झाल्यामुळे तपास करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिले होते. त्यानुसार पाटोदा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व आरोपीला अटक केली होती मात्र, पिस्टल हस्तगत झाले नव्हते. दरम्यान, उपाधीक्षक विजय लगारे, स्थागुशा प्रमुख घनश्याम पाळवदे, पोनि सिद्धार्थ माने, उपनि वैशाली पेटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी सागर गर्जे याच्या फिर्यादीवरुन राजू खाडे व दादा खाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यावरुन पोलिसांनी अटक केली होती मात्र हत्यार हस्तगत झाले नव्हते. पोलिसांनी खाक्या दाखवत चौकशी केल्यानंतर आपण गोळीबार केल्याची कबुली दिली. हे पिस्टल हस्तगत केले. तपास विजय लगारे करत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीBeed S Pपोलीस अधीक्षक, बीड