शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

फर्निचर दुकानात आगीचे तांडव, अग्मिशमन गाडी आहे पण कर्मचारीच नसल्याने नागरिक हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 18:58 IST

एकाबाजूने दवाखाना तर दुसऱ्या बाजूने कपड्याचे दुकान असल्याने नागरिकांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले.

वडवणी ( बीड ) : शहरातील बालाजी फर्निचर या दुकानाला आज चार वाजेच्या सुमारास शाॅर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. शहरात केवळ अग्निशमन गाडी असून कर्मचारीच नसल्याने आगीत दोन मजली दुकानाची राख होताना नागरिक आणि दुकान मालक हतबलतेने पाहत होते. या आगीत फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मुख्य रस्त्यावरील विजय मायकर यांच्या मालकीचे बालाजी फर्निचर हे दुकान आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी दुकानाला मोठ्या उत्साहात सुरुवात केली होती. दुकानात खालच्या मजल्यावर फर्निचर तर वरच्या मजल्यावर इलेक्ट्रोनिक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. आज दुपारी चार वाजेच्या सुमारास वरच्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. क्षणार्धात आगीने वरचा मजला कवेत घेतला. आग पसरत असल्याचे लक्षात येताच दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांनी खालच्या मजल्यावरील सामान बाहेर काढण्याच्या प्रयत्न केला. दरम्यान, वरच्या मजल्यावरील फ्रीजला आग लागल्याने त्यातील गॅसचा स्फोट झाला. यामुळे आग झपाट्याने पसरली. एकाबाजूने दवाखाना तर दुसऱ्या बाजूने कपड्याचे दुकान असल्याने नागरिकांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले. मात्र, आगीने भीषण स्वरूप धारण केल्याने नागरिकांचे प्रयत्न तोकडे पडत होते. त्यातच शहरात अग्निशमन दलच उपलब्ध नसल्याने नागरिक हतबल झाले. तब्बल दोन तास आगीचे तांडव सुरु होते. वेळीच आग आटोक्यात न आल्याने संपूर्ण दुकानाची राख झाली.  

अग्निशमन गाडी शोभेची वस्तू शहरात अग्निशमन गाडी असून येथे कर्मचारीच नाहीत. यामुळे अग्निशमन गाडी शोभेची वस्तू झाली आहे. आग विझविण्यासाठी सुविधाच उपलब्ध नसल्याने आज दुकानाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले. नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करूनही आग आटोक्यात आली नाही. शेवटी तेलगाव येथील सुंदरराव सोळुंके साखर कारखाना येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. एका बंबाने आग आटोक्यात येत नव्हती, यामुळे खाजगी टँकरच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. तब्बल दोन अडीज तासानंतर आगीवर नियंत्रण मिळाले. 

टॅग्स :Beedबीडfireआग