शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या कांदा व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 23:55 IST

बीड : धारुर तालुक्यातील आरणवाडी येथील कांदा उत्पादक शेतकºयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापा-याविरोधात धारूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तालुक्यातील आरणवाडी येथील शेतकरी उन्हाळ्यात कांद्याचे पीक घेतात. कांद्याची चव, चकाकी, गुणवत्ता असल्यामुळे विविध ठिकाणच्या बाजार समितीमधील व्यापारी येथे येतात. त्याप्रमाणे कांदे काढणीला आले असता ...

बीड : धारुर तालुक्यातील आरणवाडी येथील कांदा उत्पादक शेतकºयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापा-याविरोधात धारूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तालुक्यातील आरणवाडी येथील शेतकरी उन्हाळ्यात कांद्याचे पीक घेतात. कांद्याची चव, चकाकी, गुणवत्ता असल्यामुळे विविध ठिकाणच्या बाजार समितीमधील व्यापारी येथे येतात. त्याप्रमाणे कांदे काढणीला आले असता हनीफ रुकमोद्दीन अतनूरकर (रा. एल २, गाळा नंबर ४९, सिद्धेश्वर मार्केट यार्ड, सोलापूर) हा व्यापारी आरणवाडी येथे आला.

येथील शेतक-यांना मी सोलापूर बाजार समितीतील मोठा व्यापारी असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या कांद्याला चांगला भाव मिळवून देतो, तुम्ही मला जास्तीत जास्त कांदे द्या, असे म्हणून जवळपास सात शेतकºयांचे २५ ते ३० टन कांदे खरेदी केले होते. याचा मोबदला म्हणून व्यापाºयाने शेतकºयांना धनादेशाच्या स्वरूपात तीन लाखांच्या जवळपास रक्कम दिली होती.

मात्र, व्यापा-याने दिलेले धनादेश चार महिने उलटून गेले तरी वटलेच नाहीत. यामुळे शेतकरी सोलापूर येथे या व्यापा-याकडे पैशासाठी हेलपाटे मारत आहेत. मात्र, व्यापारी सतत शेतकºयांना मी मोठा व्यापारी असल्याचे सांगत धमकी देत होता.

धनादेश वटला नसल्याचे शेतक-यांनी सांगितले असता त्यांना दमदाटी करण्यात आली. तरीही शेतक-यांनी तगादा लावला. चार महिने वाट पाहून विकलेल्या कांद्याची रक्कम न मिळाल्याने शेतक-यांनी अखेर धारुर ठाण्यात धाव घेत व्यापारी हनीफ अतनूरकर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व्यापा-याविरोधात अनेक तक्ररीअनेक ठिकाणी हनीफ याच्या विरोधात शेतकºयांच्या अशाच तक्रारी आहेत. अनेकाला त्याने फसवले असून इतर जिल्ह्यातही त्याच्या विरोधात यापूर्वी गुन्हे नोंद झाले असल्याची माहिती समोर आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

सोलापुरातही हनीफ वादग्रस्तहनीफच्या वर्तणुकीमुळे सोलापूर बाजार समितीने काही वर्षापूर्वी त्याचा परवाना रद्द केला होता.मात्र दुस-याच्या नावे हा व्यापारी बाजार समितीत खरेदी, विक्र ीचे व्यवहार करत असून शेतक-यांची फसवणूक करत आहे. बाजार समितीच्या सभापतींकडे याबाबत तक्र ार करु नही त्यांनी मात्र याची दखल घेतली नाही, असे शेतक-यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीbusinessव्यवसायfraudधोकेबाजी