शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दरफलक लपवून रूग्णांची आर्थिक लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:34 IST

रिॲलिटी चेक बीड : ज्या खासगी रुग्णालयांना कोरोनाबाधितांवर उपचारासाठी परवानगी दिली आहे, त्यांनी दर्शनी भागात दरफलक लावणे अपेक्षित आहे; ...

रिॲलिटी चेक

बीड : ज्या खासगी रुग्णालयांना कोरोनाबाधितांवर उपचारासाठी परवानगी दिली आहे, त्यांनी दर्शनी भागात दरफलक लावणे अपेक्षित आहे; परंतु खासगी डॉक्टर हे दरफलक न लावताच अवाच्च्या सव्वा दर लावून लााखोंची बिले वसूल करीत आहेत. याकडे प्रशासनाकडून याची कसलीच तपासणी केली जात नसल्याने संशय व्यक्त होत आहे. याचा फटका मात्र सामान्यांना बसत आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी ५७५ रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी आणखी ७१६ रुग्णांची भर पडली. मागील आठवड्यापासून कोरोना उच्चांक गाठत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असल्याने शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांना कोरोनाबाधितांवर उपचारास परवानगी दिली. यासाठी शासनानेच खासगी रुग्णालयांना दर निश्चित करून काही नियमावली दिली होती. परंतु बीडमध्ये याचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. शहरातील काही खासगी रुग्णालयांना भेटी दिल्या असता कोठेच दर्शनी भागात दरफलक दिसला नाही. शिवाय आतमध्येही सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते. रुग्णांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत होते, परंतु केवळ दुसरीकडे बेड मिळणार नाही, या भीतीने ते पैसा खर्च करून येथे शांतपणे उपचार घेत आहेत. प्रशासनाकडून मात्र, याची कसलीही तपासणी केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

----

बेड हजाराचा आणि बील साडेचार हजार

सामान्य रुग्णांकडून जनरल वॉर्डमधील एका खाटासाठी साडेचार हजार रुपये बील घेतले जाते. प्रत्यक्षात या बेडची किंमतच हजार रुपये असते. किमान खाटा तरी दर्जेदार ठेवाव्यात, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वाईकर यांनी केली.

इन्शूरन्स नसल्याने आर्थिक ताण

शासनाने काढलेले हे आदेश मेट्रो सिटीच्या दृष्टीने लाभदायक असतील. तेथे लोक इन्शुरन्स पॉलिसी काढतात; परंतु बीडसारख्या जिल्ह्यात सामान्यांना त्याबद्दल माहिती नाही. त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचे बिले भरताना ओढाताण करावी लागत आहे. शासनाने ठरवलेले दर सामान्यांसाठी आर्थिक लूट करणारे असल्याचा आरोप केला जात आहे.

एका किटमध्येच सर्व राऊंड

कोरोनाबाधितांवर उपचार करणारे बहुतांश खासगी डॉक्टर हे पीपीई किट वापरत नाहीत. जे वापरतात ते एकाच कीटमध्ये पूर्ण राऊंड घेतात. बिल आकारताना मात्र, प्रत्येकाच्या बिलात स्वतंत्र पैसे लावत आहेत. एका किटसाठी किमान १००० ते १९०० रुपयांपर्यंत बील वसूल केले जात असल्याचे सूत्रांकडून समजते.

सीएसची तत्परता, तत्काळ सूचना

खासगी रुग्णालयांत दर्शनी भागात दरफलक लावला जात नाही. तसेच इतर सुविधा आणि तक्रारींची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांना समजली. त्यांनी तत्काळ अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांना डॉ. सुखदेव राठोड यांना सूचना करीत दरफलक लावण्यास सांगितले. जे लावणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करा, असेही ते म्हणाले.

कोट

ऑडीटच्या दरम्यान दर फलक दिसले होते. तसेच ते कायम लावणे बंधनकारक आहे. एकदा सूचना करू. नंतर अचानक तपासणी करून कारवाई केली जाईल.

डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

--

काेठे काय आढळले

१) जालना रोडवरील एका खासगी रुग्णालयाची पाहणी केली. येथे गेटला कुलूप होते. दर्शनी भागात दरफलक नव्हता. सूरक्षा रक्षक असला तरी येथे नातेवाइकांची गर्दी होती. दोन दिवसांपूर्वीच येथील सुविधांबद्दल तक्रार करीत वादही झाला होता. येथे जास्तीचे बिले घेत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. परंतु त्याची लेखी तक्रार न करताच हे प्रकरण आपसांत मिटले होते. येथील आयसीयूदेखील जनरल वॉर्डप्रमाणे असल्याचे सांगण्यात आले.

२) शाहूनगर भागातील डीपी रोडवर दुसऱ्या मजल्यावर कोविड सेंटर आहे. या इमारतीच्या तळघरातही बाधितांवर उपचार केले जातात. केवळ दोन फुटाच्या अंतरावर खाटा आहेत. तसेच सर्वांसाठी एकच शौचालय आहे. येथील आयसीयू साधारण असून, कायम ये-जा होत असल्याने गोंधळ असतो. येथे कोरोना नियमांचे पालन केले जात नव्हते.

-----

जिल्ह्यातील एकूण आरोग्य संस्था ५१

शासकीय आरोग्य संस्था २०

एकूण खासगी रुग्णालये ३१

---

असे आहे दर प्रतिदिन

साधारण वाॅर्ड ४०००

व्हेंटिलेटरविना आयसीयू ७५००

आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरसह ९०००