शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अनधिकृत बांधकामधारकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 01:00 IST

अनधिकृत बांधकाम केल्याचे तपासणीतून सिद्ध झाले. दुपारी गुन्हा एका महिलेसह सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अनधिकृत बांधकाम केल्याचे तपासणीतून सिद्ध झाले. त्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पालिकेने बीड शहर पोलिसांना पत्र दिले. मात्र, चौकशी व कलमांची चाचपणी करण्याच्या नावाखाली आणि पालिका व पोलिसांमध्ये समन्वय नसल्याने गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली जात होती. हीच बाब ‘लोकमत’ने गुरूवारी वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणली. त्यानंतर पालिका कर्मचारी नियमांचे पुस्तक घेऊनच ठाण्यात गेले. अखेर दुपारी गुन्हा एका महिलेसह सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.हुमेरा जबीन जमील आहेमद खान व इतर सहा ते सात (सर्व रा.कारंजा रोड, बीड) यांनी बीड पालिकेकडून परवानगी घेऊन बांधकाम (घर क्र.१-८-८४) करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर प्र.स्वच्छता निरीक्षक सहायक रचनाकार अंकुश लिमगे यांनी स्थळ पाहणी केली. यामध्ये त्यांनी परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केल्याचे उघड झाले. त्यांना रीतसर नोटीसही दिली. मात्र, ती त्यांनी स्विकारली नव्हती. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५३(१) (बी) अन्वये त्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी याबाबत रीतसर बीड शहर पोलिसांना पत्र दिले. मात्र, पोलिसांनी चौकशी व कलमांची चाचपणी करण्याच्या नावाखाली गुन्हा दाखल करून घेतला नाही. तर पालिकेनेही पत्र दिल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले होते.हाच धागा पकडून ‘लोकमत’ने गुरूवारी ‘पोलिस-पालिका समन्वय नसल्याने अनधिकृत बांधकाम धारकांना अभय’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणि कायद्याचे पुस्तक घेऊन सकाळीच शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनीही तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला.खरे बोलणे कर्मचाऱ्याच्या अंगलटयाच प्रकरणात एका कर्मचा-याला वरिष्ठांनी नोटीस काढली. मात्र, या कर्मचा-याने अहवाल दिल्यानंतरही मागील अनेक दिवसांपासून कारवाई रखडली असल्याचा प्रकार वरिष्ठांना सांगितला. आपलीच चूक काढल्याने वरिष्ठांचा ‘इगो’ जागा झाला. यामध्ये संबंधित कर्मचा-याचा अतिरिक्त पदभार काढून घेतला. प्रामाणिक आणि खरे काम करून कर्मचा-याला नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याचे समोर आले आहे. आता सध्याचे मुख्याधिकारी पुन्हा त्या कर्मचा-याकडे पदभार देतील का? हे वेळच ठरविणार आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणMuncipal Corporationनगर पालिकाLokmat Impactलोकमत इम्पॅक्ट