शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये ४० वर्षीय महिलेचे पाचव्यांदा ‘सिझर’; माता व बाळ सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:37 IST

बीड जिल्हा रूग्णालयात पाचव्यांदा यशस्वी शस्त्रक्रिया करून महिलेचे सिझर करण्यात आले.

बीड : वय ४० वर्षे.. चारही वेळेस सिझरच.. पाचव्यांदा गर्भवती.. प्रकृती अतिशय गंभीर.. या कठीन परिस्थितीवर मात करीत बीड जिल्हा रूग्णालयात पाचव्यांदा यशस्वी शस्त्रक्रिया करून महिलेचे सिझर करण्यात आले. सध्या बाळ व माता दोघेही सुखरूप आहेत. बीडमध्ये हे प्रथमच झाले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात आणि त्यांच्या टिमने ही शस्त्रक्रिया केली. 

नाझमीन मिनाज कादरी (४० रा.चकलांबा ता.गेवराई) असे या मातेचे नाव आहे. नाझमीन यांचे यापुर्वी चारवेळा सिझर झालेले असल्याने पोटात गुंतागुंत होती. त्यामुळे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करता आली नव्हती. त्यानंतर ही महिला पाचव्यांदा गर्भवती राहिली. औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालात ती वैद्यकीय गर्भपातासाठी गेली होती, परंतु गुंतागुंत होण्याची शक्यता असल्याने तिचा वैद्यकीय गर्भपात होऊ शकला नाही. रविवारी सायं ५ वाजता चकलांबा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल मुळे यांनी संबंधीत महिलेची तपासणी केली.

प्रकृती पाहून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम यांना कळवले. डॉ. कदम यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना याबाबत माहिती दिली. डॉ. थोरात यांनी तात्काळ संबंधित महिलेस बीड येथे घेऊन येण्यास सांगितले. त्या महिलेस बीडमध्ये सिझर होणार नाही, असे सांगितल्याने ते सोमवारी औरंगाबाद येथे जाणार असल्याचे सांगितले. परंतु वेळीच त्यांचे समुपदेशन करून त्यांना जिल्हा रूग्णालयात आणले आणि यशस्वी शस्त्रक्रिया केली.

तत्परता आणि यशप्रकृतीचे गांभीर्य ओळखून डॉ.थोरात व डॉ. कदम यांनी विष्णू खेडकर यांना तात्काळ शासकीय रूग्णवाहिका घेऊन चकलांब्याला पाठविले. तेथील आशा बबिता आंधळे व नीता खेडकर यांनी त्या महिलेचे समुपदेशन केले आणि तिला जिल्हा रुग्णालयात आणले. येथे तिचे सिझर आणि कुटूंबकल्याण या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या.  तत्परता दाखविल्याने यश मिळाल्याचे दिसले.

या टिमने घेतले परिश्रमजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, डॉ.संजय कदम, डॉ.माजेद शेख, डॉ. राजश्री शिंदे, डॉ. सदाशिव राऊत, डॉ. परमेश्वर डोंगरे, भूलतज्ञ डॉ. श्रीकांत मोराळे, डॉ.अर्जुन तांदळे, डॉ. अविनाश ठोंबरे,बालरोगतज्ञ डॉ. कौशल्या शिंदे, मोमीन जफर, महेंद्र भिसे, संदीप बामणे या टिमने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

अशा शस्त्रक्रिया क्वचितच पाचव्यांदा सिझरचे प्रमाण अत्यल्प असून गुंतागुंतीचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे अशा शस्त्रक्रिया फक्त वैद्यकीय महाविद्यालयात व त्या सुद्धा क्वचितच होतात. बीड जिल्हा रूग्णालयात पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती. परंतु आम्ही ती यशस्वी केली. याचे श्रेय सर्व टिमला आहे.- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडhospitalहॉस्पिटलpregnant womanगर्भवती महिलाdoctorडॉक्टर