शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गेवराई तालुक्यातील  पंधरा गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:27 IST

तालुक्यातील लुखामसला येथील ३३ केव्ही उपकेंद्रामधील ५ एमव्ही पॉवर ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे रेवकी-देवकी सर्कलमधील पंधराहून अधिक गावे पाच दिवसांपासून अंधारात आहेत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे दुर्लक्ष : पाणी असतानाही विजेविना शेतीला देता येईना

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील लुखामसला येथील ३३ केव्ही उपकेंद्रामधील ५ एमव्ही पॉवर ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे रेवकी-देवकी सर्कलमधील पंधराहून अधिक गावे पाच दिवसांपासून अंधारात आहेत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच सध्या उजव्या कालव्याला पाणी सोडलेले असताना विजेअभावी शेतीपंप बंद असल्याने पिकांचे देखील नुकसान होत आहे. तरी याकडे महावितरणचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.यावर्षी पावसाअभावी शेतकरी हवालदिल झालेला आहे.दरम्यान, सध्या शेतीसाठी पैठणच्या धरणातून उजव्या कालव्यात पाणी सोडलेले आहे. तालुक्यातील रेवकी सर्कमधील १५ हून अधिक गावातून हा कालवा गेलेला असून, हा कालवा सध्या तुडूंब भरु न वाहत आहे. मात्र रेवकी सर्कमधील गावांना वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या लुखामसाला येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील पाच एमव्हीचा ट्रान्सफार्मर पाच दिवसांपूर्वी जळाला आहे.विजेअभावी शेतीपंप बंद आहेत. परिणामी शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर नागरिकांना देखील दळणवळणासह अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज ट्रान्सफार्मर दुरुस्त करुन प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे. १५ हून अधिक गावे अंधारात असताना देखील महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याने शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.दोन दिवसात ट्रान्सफार्मर कार्यान्वित कराएकीकडे पाऊस नसल्याने पिके संकटात सापडली आहेत. तर कालव्याला पाणी आलेले असताना विजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना शेतकºयांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे महावितरण दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे याप्रकरणी आ. लक्ष्मण पवार, रेवकी गटाच्या जि.प. सदस्या सविता बाळासाहेब मस्के यांच्याकडे शेतकºयांनी गाºर्हाणे मांडताच त्यांनी दोन दिवसांत लुखामसाला येथील ३३ केव्ही उपकेंद्रामधील जळालेला ट्रान्सफार्मर कार्यान्वित करा, असे आदेश वीजवितरण कार्यालय, बीड यांना दिले आहेत. यावेळी या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरण