शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कड्यात शॉर्टसर्किटने ज्वेलर्सच्या दुकानात भीषण आग; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 13:34 IST

आगीमुळे दुकानातील सर्व वस्तूंचा अक्षरशः कोळसा झाला आहे

ठळक मुद्देसोन्याचांदीचे दागिने, फर्निचर आणि काही रोख रक्कम आगीच्या भक्ष्यस्थानी

कडा : शनिवारी पहाटे अचानक शॉर्टसर्किट होऊन फुलचंद पुनमचंद भंडारी या सोन्याचांदीच्या दुकानात भीषण आग लागली. आगीमुळे दुकानातील सर्व वस्तूंचा अक्षरशः कोळसा झाला असून यात लाखोंचे नुकसान झाल्याचे सराफा दुकानदार दिलीप भंडारी यांनी सांगितले.

आष्टी तालुक्‍यातील कडा येथे फुलचंद पुनमचंद भंडारी यांचे पेठेत सोन्या, चांदीचे दुकान आहे. शुक्रवारी नेहमी प्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले. शनिवारी पहाटे त्यांना दुकानातून धुराचे लोट दिसले. अग्निशमन दल आणि इतरांना याची माहिती देत यांनी लागलीच दुकानाकडे धाव घेतली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण दुकान कवेत घेतले. या भीषण आगीत दुकानातील सोने, चांदीचे दागिने, लॅपटॉप, संपूर्ण फर्निचर, सीसीटीव्ही आणि काही रोख रक्कम जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाने मोठ्या शर्थीने आग आटोक्यात आणली. आगीत संपूर्ण दुकानाचा कोळसा झाला असून लाखोंचे नुकसान झाले असल्याचे दुकानदार  दिलीप फुलचंद भंडारी यांनी सांगितले.

शॉर्टसर्किटने लागली आग दुकानातील वायरींग जळाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. यामुळे नागरिकांनी महावितरणला फोन करून वीज बंद केली. यानंतर अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.ही भीषण आग विझविण्यासाठी अनिल ढोबळे, शंकर देशमुख, रमेश शिरोळे, स्वप्नील मखाना, सुमीत भंडारी, उतरेश्वर वेदपाठक, दिनेश भंडारी, सागर क्षीरसागर, गणेश देवकर, सुधीर देवकर, अमोल जाधव,  यांनी  प्रयत्न केले. 

टॅग्स :Beedबीडfireआग