शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वेअर हाउसला भीषण आग, संशयाचा धूर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:02 IST

बीड : तालुक्यातील जप्ती पारगाव जवळ असलेल्या एका वेअर हाउसला मोठी आग आगाली आहे. या आगीमध्ये शासनाने व काही ...

बीड : तालुक्यातील जप्ती पारगाव जवळ असलेल्या एका वेअर हाउसला मोठी आग आगाली आहे. या आगीमध्ये शासनाने व काही खासगी व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या असून, जवळपास ५० ते ५५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वेअर हाउस चालकांकडून व्यक्त करण्यात आला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान घडली, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ ते १५ गाड्या मध्यरात्रीपासून कार्यरत होत्या. मात्र, मोठ्या प्रमाणात गाठी असल्यामुळे आग आटोक्यात आलेली नव्हती. वेअर हाउसमध्ये वीज नसते, त्यामुळे आग लागण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, आग लागली की लावली, असा संशय व्यक्त होत आहे.

बीडपासून काही अंतरावर असलेल्या जप्ती पारगाव येथे खिंवसरा, नहार, कोटेचा, बागमार या चौघांचे ‌वेअर हाऊस आहे. ते बुलडाणा अर्बनने भाड्याने घेतले होते. यामध्ये पणन महासंघाच्या २१ हजार १५० व खासगी व्यापारी व जिनिंगच्या ५ हजार ५१ अशा मिळून २६ हजार २०१ कापसाच्या गाठी गोदामात ठेवलेल्या होत्या. मंगळवारी मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान या ठिकाणी आग लागली. ही माहिती जप्ती पारगाव येथील नागरिकांनी गोदाम मालकांना दिली. त्यानंतर, गेवराई आणि बीड येथील बाजार समिती, तसेच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, आग एवढी मोठी होती की, उपलब्ध बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणणे शक्य नव्हते. त्यामुळे पुन्हा माजलगाव, परळी, औरंगाबाद येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल. जवळपास १२ ते १५ वाहनांद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न मध्यरात्रीपासून अग्निशमनचे जवान करत होते. मात्र, त्या ठिकाणी जवळ पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आग विझविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, या आगीत सर्वकाही भस्मसात झाले असून, किमान आठ दिवस आग धगधगत राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत गोदाम मालकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, आग पूर्ण विझल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बुलढाणा अर्बन क्रेडीट सोसायटी लि. गोदाम

पणन महासंघाच्या कापूस गाठी गोदामात ठेवण्यासाठी बुलढाणा अर्बन बँकेसोबत करार झालेला आहे. जप्ती पारगाव येथील गोदाम देखील बुलढाणा बँकेने किरायाने घेऊन त्याठिकाणी पणन महासंघाने गाठी ठेवल्या होत्या, या गोदामाला आग लागली आहे. दरम्यान औरंगाबाद तालुक्यातील गंगापूर येथील धान्य गोदामाला देखील आग लागली होती. त्यामुळे संशय व्यक्त केला जात असून, शासनाची फसवणूक टाळण्यासाठी सखोल चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

अग्निरोधक व्यवस्था नाही

जप्ती पारगाव येथील वेअर हाऊस येथे कापसाच्या गाठी ठेवल्या होत्या. गोदामात वीज कनेक्शन नव्हते, तर आग कशी लागली? गोदामात आगरोधक कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे नेमकी आग कशी लागली? हे पोलीस तपासात उघड होईल.

===Photopath===

020321\022_bed_22_02032021_14.jpg~020321\022_bed_21_02032021_14.jpg

===Caption===

आगीत भस्मसात झालेल्या कापसाच्या गाठी ~आग विझविण्याचा प्रयत्न करताना अग्निशमन दलाचे जवान