शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

परळीतील एमआयडीसीमध्ये कुलर कंपनीत भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 19:26 IST

आगीत कंपनीत असलेले कुलरचे संपूर्ण साहित्य जळाले आहे. 

ठळक मुद्देअग्निशमन दल घटनास्थळी दाखलआगीचे कारण आणि किती नुकसान झाले अद्याप अस्पष्ट

परळी : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये साई एअर कुलर इंडस्ट्रीज मध्ये  बुधवारी  सायंकाळी 6 च्या सुमारास भीषण आग लागली आहे. आगीत कंपनीत असलेले लाखो रुपयांचे कुलरचे संपूर्ण साहित्य जळाले आहे. घटनास्थळी नगरपालिका, वैद्यनाथ साखर कारखाना आणि औष्णिक विद्युत केंद्र येथील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.  नगरसेवक, नागरिक यांचे मदतकार्य सुरू आहे. आगडोंब उसळल्याने या भागात नागरिकांची प्रंचड गर्दी जमली आहे.

येथील कुलर चे व्यापारी सुनील सोळंके यांचे    शहरातील वैद्यनाथ औद्योगिक वसाहती मध्ये       साई एअर कुलर इंडस्ट्रीज नावाचा  कुलरच्या कारखाना आहे .या कारखान्यास बुधवारी सायंकाळी अचानक आग लागली. लागलीच तेथील कामगारांनी आरडा ओरड सुरू करून मदती साठी शेजाऱ्यांना हाक दिली.. आगीची माहिती कळताच परळी न प चे गटनेते वाल्मीक कराड, मुख्याधिकारी अरविंद मुंडे,नगर सेवक चंदुलाल बियाणी ,राजा खान, भाजपाचे शहरध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, नरसिंग सिरसाठ आदींनी धाव घेतली.

कुलरच्या कारखान्याशेजारीच कपाट कारखाना व ऑइल मिल आहे. एमआयडीसीमधील सर्व उद्योजकही आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण आणि किती नुकसान झाले हे अद्याप  स्पष्ट झाले नव्हते.

टॅग्स :BeedबीडMIDCएमआयडीसीfireआग