शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Beed: वडील वर्ग-१ अधिकारी, आई प्राध्यापिका; दर्जदार शिक्षणासाठी मुलीला टाकले ZP शाळेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 19:16 IST

उच्चशिक्षित देशमुख दाम्पत्यांने दर्जेदार शिक्षणावर विश्वास ठेवत जिल्हा परिषद शाळेला पसंती दिली. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

- पुरूषोत्तम करवामाजलगाव ( बीड): दर्जेदार जिल्हा परिषद शाळा डावलून अनेक पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे आहे. मात्र, याला देशमुख दाम्पत्य अपवाद ठरले आहे. अंबाजोगाई येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये जेष्ठ अधिव्याखाता श्रीकिशन देशमुख आणि लोकनेते सुंदरराव सोळंके महाविद्यालयातील प्राध्यापक किरण तौर देशमुख यांनी आपल्या सानिका या पाच वर्षीय मुलीचा जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. शहरापासून जवळ गुजर पंचशील नगर शाळेत पहिलीच्या वर्गात आज, सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी सानिकाचा प्रवेश झाला.

जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी होत असताना अशा प्रकारचा निर्णय ज्येष्ठ अधिव्याखाता श्रीकृष्ण देशमुख यांनी घेतला. ही बाब कौतुकास्पद मानली जात आहे. विशेष बाब, म्हणजे श्रीकिशन देशमुख यांच्या पत्नी किरण तौर देशमुख या माजलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम पाहतात. सधन असताना देखील देशमुख दाम्पत्यांनी आपल्या पाच वर्षाच्या सानिका या मुलीचा प्रवेश  माजलगाव शहरापासून दहा किमी अंतरावर असलेल्या सावरगाव केंद्र अंतर्गत गुजर पंचशील नगर येथील शाळेत घेतला आहे. तिला शाळेत येणजाणे करण्यासाठी रिक्षाची देखील सोय त्यांनी केली आहे. उच्चशिक्षित देशमुख दाम्पत्यांने दर्जेदार शिक्षणावर विश्वास ठेवत जिल्हा परिषद शाळेला पसंती दिली. त्यांच्या निर्णयाचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून कौतुक होत आहे.

मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थीइंग्रजी माध्यमापेक्षा मराठी माध्यमांच्या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. इंग्रजी शाळेतील विद्यार्थी मशीन सारखे घडवले जातात. त्यामुळे लहान मुलांना मातृभाषेतून शिक्षण महत्त्वाचे आहे. माझे शिक्षण देखील जिल्हा परिषद  शाळेत झाले आहे. - श्रीकिशन देशमुख , सानिकाचे वडील

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाBeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्र