शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी माध्यम शाळा चालकांचे बीडमध्ये उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:56 IST

आर .टी .ई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाच्या शैक्षणिक प्रतिपूर्तीचा निधी उपलब्ध होऊनही शिक्षण विभागाकडून निधी वितरीत करण्यास टाळाटाळ होत असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळा संचालकांनी गुरुवारी शिक्षण विभागासमोर उपोषण केले.

ठळक मुद्देआर .टी .ई : दोन वर्षांचा प्रवेश निधी रखडल्याने इंग्रजी शाळांच्या अडचणींत वाढ; शिक्षण विभागाकडून निधी वितरणात टाळाटाळ

बीड : आर .टी .ई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाच्या शैक्षणिक प्रतिपूर्तीचा निधी उपलब्ध होऊनही शिक्षण विभागाकडून निधी वितरीत करण्यास टाळाटाळ होत असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळा संचालकांनी गुरुवारी शिक्षण विभागासमोर उपोषण केले. जिल्ह्यातील १४५ इंग्रजी शाळांचे प्रतिपूर्ती अनुदान मागील दोन वर्षांपासून रखडल्याने या शाळा व्यवस्थापनासमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे.शासनाच्या आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश दिला जातो. शासनाकडून प्रवेशासाठी शाळांकडे पाठपुरावा केला जातो. मात्र या शाळांना प्रतिपूर्ती रक्कम देताना मात्र यंत्रणेचे दुर्लक्ष होते. आर .टी .ई अंतर्गत सन २०१६-१७ आणि २०१७ या शैक्षणिक वर्षांतील २५ टक्के प्रतिपूर्ति अनुदान उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा आर्थिक अडचणीत आल्या आहेत. या संदर्भात १ नोव्हेंबर २०१८ च्या परिपत्रकानुसार सर्व शाळांच्या तालुका गटशिक्षणाधिकारी मार्फत जानेवारी महिन्यात तपासण्या झाल्या आहेत. तसेच शुल्क प्रस्ताव व सर्व कागदपत्रांची पूर्तता जिल्ह्यातील सर्व शाळांनी गट शिक्षण कार्यालयाकडे केलेली आहे. असे असताना देखील शासनाकडून उपलब्ध झालेला प्रतिपूर्ति अनुदानाचा निधी अद्यापही वर्ग केलेला नसल्याने इनडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन (ईसा) च्या वतीने गुरुवारी उपोषण करण्यात आले.यावेळी संघटनेचे प्रदेश सचिव निखिल वाघमारे, जिल्हाध्यक्ष दिलीप पारेकर, जिल्हा सचिव श्रीमंत सानप, गणेश क्षीरसागर, गणेश मैड, अखिलेश ढाकणे, प्रशांत मानधने, नागसेन कांबळे, भास्कर बने, प्रमोद डोंगरे, ज्ञानेश्वर धायतिडक, निरंजन जुळे, राधेशाम चव्हाण, गोपाल शर्मा, श्रीराम अनभुले, योगेश कुलकर्णी, नागेश पुष्कर, बी. आर. आगाम, के. एच. इनामदार, शेख चाँद, विल्सन वानखडे, प्रशांत भोले, अविनाश भवर, गोपीचंद शिंदे ,अतुल जगताप ,संदीप वारे, दत्तात्रय देवगुडे, सुनील म्हस्के यांच्यासह संस्था चालक उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्रagitationआंदोलन