शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात शेतकऱ्यांचा कापसाच्या मापासाठी चार तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 18:25 IST

आणखी एक खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा

ठळक मुद्देकापसाची वाहने ग्रेडिंगसाठी सोडण्यात आली

माजलगाव : येथे कापूस घालण्यासाठी शेतकऱ्यांच्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असताना पणन महासंघाकडून केवळ दोनच कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. यामुळे   शुक्रवारी दुपारी टीएमसी केंद्रावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. शेवटी  रमेश आडसकर यांच्या पुढाकाराने यार्डमध्ये उभी असलेली कापसाची वाहने ग्रेडिंगसाठी सोडण्यात आली तर आणखी एक खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

तालुक्यात यावर्षी कापसाचे प्रचंड उत्पादन झाले असून त्यामुळे शेतकरी खुष आहे. मात्र आपला कापूस खरेदी केंद्रावर घालण्यासाठी शेतकरी दररोज खेटे मारत असून तालुक्यात अंबादास व मनकॉट जिनींग या दोन ठिकाणीच शासकीय खरेदी सुरू आहे. त्यामुळे तेथे शेतकऱ्यांनी कापूस घालून आणलेल्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असल्याचे चित्र आहे. परंतु या ठिकाणी ग्रेडर अनंत मोरेची मनमानी सुरू असल्याने शेतकऱ्यांना चार-चार दिवसांपासून वाहनांचे भाडे भरत दिवसरात्र तिष्ठत राहावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटला. शुक्रवारी दुपारी टीएमसी केंद्रावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.

याची माहिती मिळताच  भाजप नेते रमेश आडसकर यांनी तेथे जात शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. तात्काळ संबंधित अधिकारी व ग्रेडर यांना प्रकरणाचे गांभीर्य सांगून इतर दोन खरेदी केंद्र सुरू करावयास भाग पाडले. तात्काळ पूर्वा जिनींग सुरू करण्यात आली. तर सोमवारी आणखी एक जिनींग सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपली वाहने येथून हलवली. या ठिकाणी  जवळपास चारशे वाहने कापूस तीन खरेदी केंद्रावर विभागून दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी रामेश्वर टवानी,रामू चांडक,ईश्वर खुरपे,मनोज फरके उपस्थित होते.

ग्रेडरकडून अडवणूक डीडीआर यांनी प्रत्येक जिनींगला वार ठरवून दिलेले आहेत. तरीही येथील ग्रेडर अनंत मोरे हे जागेचे कारण पुढे करून आमच्या जिनींगसाठी मापे घेण्यास टाळाटाळ करतात. यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आपला कापुस दूरवर घेऊन जाण्याची वेळ येत आहे. - प्रविण चांडक , जिनींग मालक

टॅग्स :BeedबीडcottonकापूसFarmerशेतकरी