शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

थंडीने ज्वारी काकडली तर गहू, हरभर्‍यावर कीड; बीड जिल्ह्यातील शेतक-यांना आता उन्हाळी पिकांचे वेध  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 19:34 IST

मागील दोन आठवड्यांपासून गारठा वाढल्याने ज्वारीच्या वाढीला फटका बसत असून गहू, हरभर्‍याला सर्वोत्तम वातावरण असले तरी  किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. दुसरीकडे कृषी विभागाने व तज्ज्ञांनी आवाहन करुनही ज्या शेतकर्‍यांनी कापूस उपटला नाही, त्यांच्या कापसाला बोंडे फुटू लागली आहेत. 

बीड : मागील दोन आठवड्यांपासून गारठा वाढल्याने ज्वारीच्या वाढीला फटका बसत असून गहू, हरभर्‍याला सर्वोत्तम वातावरण असले तरी  किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. दुसरीकडे कृषी विभागाने व तज्ज्ञांनी आवाहन करुनही ज्या शेतकर्‍यांनी कापूस उपटला नाही, त्यांच्या कापसाला बोंडे फुटू लागली आहेत. 

बीड जिल्ह्यात यंदा पाऊसप्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहिल्याने शेतकरी विविध पिके घेत आहेत. यंदा रबी हंगामात ज्वारीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असलीतरी अलीकडच्या कालावधीत वाढत्या थंडीमुळे ज्वारी उत्पादकांना त्रास सहन करावा लागत आहे. गारठ्यामुळे उशिरा पेरलेली ज्वारी काकडली आहे. पोटर्‍यात आलेल्या ज्वारीमध्ये कणसाला पीळ पडण्याची शक्यता वाढली असून साखर चिकटाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ‘खडखड्या’ रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. काही ठिकाणी ज्वारीवर मावाची शक्यता असल्याने शिफारशीप्रमाणे उपाययोजना शेतकर्‍यांना करावी लागणार आहे. खडखड्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी १०० लिटर पाण्यात २ किलो युरियाची फवारणी तसेच मावा असेल तर त्यात १५० मि.ली. रोगर (डायमेट्रेट) ची फवारणी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावी लागणार आहे. 

लहरी निसर्ग बोंडअळीमुळे फटका बसल्यानंतर शेतकर्‍यांनी कपाशी उपटून गहू आणि हरभर्‍याचा पेरा केला. कापसातून नुकसानीची कसर यातून काढता येईल अशी अपेक्षा असतानाच निसर्गाच्या लहरीपणामुळे गहू आणि हरभर्‍यावर कडाक्याच्या थंडीचा परिणाम झाला आहे.

साखरचिकटा, खडखड्याचा प्रादुर्भावसुरुवातीला तसेच वेळेवर पेरा केलेली ज्वारी दाणे भरुन परिपक्व झाल्याने कसलाही धोका नाही, मात्र उशिरा पेरणी केलेल्या ज्वारीची वाढ खुंटत आहे, मात्र बीड जिल्ह्यात हे क्षेत्र कमी आहे. वाढत्या थंडीमुळे पेशीरस पानांवर साखरेप्रमाणे पसरत आहे. साखरचिकटादेखील वाढीला अडथळा ठरत आहे. उशिरा पेरलेल्या गव्हावर खोडकिडी, मावा, तांबेरा तर हरभर्‍यावर मर आणि घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित शेतकर्‍यांनी शिफारशीनुसार फवारणी करणे आवश्यक बनले आहे. 

उन्हाळी पिकांचे वेधयावर्षी चांगल्या पावसामुळे शेतकर्‍यांचा उन्हाळी बाजरी, उन्हाळी भुईमुगाचे पीक घेण्याकडे कल वाढत आहे. शिरुर, पाटोदा, गेवराई, बीड तालुक्यात उन्हाळी बाजरी तर बीड, धारुर, वडवणी, शिरुर, पाटोदा तालुक्यात उन्हाळी भुईमुगाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. 

कपाशीला बोंडे, पण भीतीगुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानंतर कपाशी उपटण्याचे व पळाट्या जाळून टाकण्याचे तसेच एकही बोंड शेत व परिसरात राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले होते. पाणी उपलब्ध असलेल्या बहुतांश शेतकर्‍यांनी कपाशी उपटून गहू, हरभर्‍याचा पेरा केला. परंतु, ज्या कोरडवाहू शेतकर्‍यांनी नुकसान झालेच आहे, आता काय व्हायचे ते होईल या धाडसाने उपटण्याचा खर्च टाळून कपाशी तशीच ठेवली. हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. थंडीमुळे या कपाशीला बोंडे फुटू लागली आहेत. त्यामुळे त्यांच्या आशा पल्लवीत झाल्याचे दिसून येत आहेत.

बोंडअळीचा धोका लक्षात घ्यावा कापसाला बोंडे फुटत असलीतरी गुलाबी बोंडअळीचा धोका लक्षात घ्यायला हवा. बोंडामध्ये सात महिने सुप्त अवस्थेत ही अळी राहते. त्यामुळे याचा परिणाम पुढील हंगामात पहायला मिळेल. आॅगस्टनंतर  कपाशीवर होणारा प्रादुर्भाव दिसून येईल.त्यामुळे कापूस हा उपटलाच पाहिजे.- रामेश्वर चांडक, कृषी तज्ज्ञ. 

जिल्ह्यातील पेरा ज्वारी    १ लाख ५१ हजार ३०७गहू            ३५ हजार ९०२ हरभरा    १ लाख १५ हजार ४१