शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

आर्वीच्या सेवा सोसायटीच्या गटसचिवाकडून अफरातफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:45 IST

तालुक्यातील आर्वी येथील सेवा सहकारी संस्थेचा गट सचिव मारोती बाळासाहेब परझने याने कर्जवसुलीपोटी जमा झालेली ३ लाख ६१ हजार ४४३ रुपयांची रक्कम बँकेत जमा न करता परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर त्याने बनावट रोजकीर्द आणि बोगस चलन केल्याचेही उघड झाल्याने लेखा परीक्षकाच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ठळक मुद्देकर्जवसुलीचे साडेतीन लाख रुपये हडपले : बनावट रेकॉर्डही केले होते तयार

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर कासार : तालुक्यातील आर्वी येथील सेवा सहकारी संस्थेचा गट सचिव मारोती बाळासाहेब परझने याने कर्जवसुलीपोटी जमा झालेली ३ लाख ६१ हजार ४४३ रुपयांची रक्कम बँकेत जमा न करता परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर त्याने बनावट रोजकीर्द आणि बोगस चलन केल्याचेही उघड झाल्याने लेखा परीक्षकाच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सहकारी संस्थांचे प्रमाणित लेखा परीक्षक काझी ऐहते शामुद्दिन नवाबुद्दिन यांनी शिरूर का. तालुक्यातील आर्वी येथील सेवा सहकारी संस्थेचे २००९ ते २०१७ कालावधीचे लेखा परीक्षण केले आहे. त्यात त्यांना अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या. या संस्थेचा गट सचिव मारोती बाळासाहेब परझने (रा. खालापुरी, ता. शिरूर) याने संस्थेच्या सभासदांकडून जमा केलेली कर्जवसुलीची ३ लाख ६१ हजार ४४३ रुपयांची रक्कम वसुली रजिस्टर व किर्दीला जमा खर्च केलीच नाही. तसेच, ही रक्कम खालापुरी येथील डीसीसी बँकेतील संस्थेच्या खात्यावर जमा न करता स्वत:जवळ ठेवून घेतल्याचे लेखा परीक्षणात उघड झाले आहे. ही रक्कम सव्याज बँकेतील खात्यात भरणा करण्यासंदर्भात परझने याला १६ आॅगस्ट २०१८ रोजी नोटीस पाठविण्यात आली. परंतु, त्यावर परझने याने असमाधानकारक खुलासा दिला. एवढेच नव्हे तर परझने याने सदरील संपूर्ण रकमेची बनावट रोजकीर्द केल्याचेही समोर आले आहे. तसेच, खालापुरी येथील डीसीसी बँकेत भरणा केलेले ४० हजारांचे चलनही बोगस आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे लेखा परीक्षक काझी ऐहतेशामोद्दिन नवाबोद्दिन यांनी परझने याच्याविरोधात शिरूर का. पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मारोती परझने याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोनि महेश टाक हे करत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी