शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नकली सोने गहाण; अ‍ॅक्सिस बँकेला १७ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:02 IST

बँकेने नेमलेल्या मूल्यमापक सोनाराने मित्रांसोबत संगनमत करून तिघा खोट्या कर्जदारांच्या मार्फत परळीच्या अ‍ॅक्सिस बँकेत नकली सोने गहाण ठेवून एकूण १७ लाखांचे कर्ज उचलल्याची घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देपरळीतील प्रकार : मूल्यमापक सोनारानेच अन्य तिघांच्या साह्याने केली फसवणूक

बीड : बँकेने नेमलेल्या मूल्यमापक सोनाराने मित्रांसोबत संगनमत करून तिघा खोट्या कर्जदारांच्या मार्फत परळीच्या अ‍ॅक्सिस बँकेत नकली सोने गहाण ठेवून एकूण १७ लाखांचे कर्ज उचलल्याची घटना उघडकीस आली आहे. बँकेच्या वार्षिक आॅडीटमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिन्ही कर्जदारांसह मूल्यमापक सोनारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परळीतील या घटनेने खळबळ उडाली आहे.सोने तारण कर्ज देण्यासाठी प्रत्येक बँकेकडून अधिकृतरीत्या सोने मूल्यमापकाची नेमणूक करण्यात येते. ग्राहकाकडून कर्जमागणीचा अर्ज आल्यानंतर मूल्य मापकाकडून सोन्याच्या गुणवत्तेचा व किंमतीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कर्ज देण्यात येते. या संपुर्ण प्रक्रियेत सोने मूल्यमापकाची भुमिका अत्यंत महत्वाची असते. परळी येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेकडून सीमा ज्वेलर्सचे व्यंकटेश वैजनाथ डुबे याची अधिकृत मूल्यमापक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. परंतु, मागील वर्षी डिसेंबर महिन्यात मूल्यमापक डुबे यानेच काही मित्रांसोबत बँकेलाच गंडा घालण्याचा कट रचला आणि नकली कर्जदार बँकेत पाठविले. त्यात सागर राजेंद्र धोकटे (रा. धोकटे गल्ली, परळी) याने १४७ ग्रॅम सोने तारण ठेऊन २ लाख ९९ हजारांचे कर्ज उचलले. रमेश दगडूबा फड याने ४५२ ग्रॅम सोन्याच्या बदल्यात ९ लाख ३४ हजार आणि गोविंद बालासाहेब सोनवणे (दोघेही रा. सुभाष चौक, परळी) याने २२४ ग्रॅम सोने तारण ठेऊन ४ लाख ६३ हजार असे तिघांनी एकूण १६ लाख ९६ हजार रुपयांचे कर्ज उचलले.या तिन्ही कर्ज प्रकरणात सोन्याचे मूल्यमापन व्यंकटेश डुबे याने केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये बँकेचे वार्षिक आॅडीट सुरु असताना सदरील सोने नकली असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे बँकेने अधिक चौकशी केली असता मूल्यमापक डुबे यानेच खोटे कर्जदार हाताशी धरून नकली सोने बँकेत जमा केले. नंतर खोटा अहवाल देत कर्ज रक्कम उचलून बँकेची फसवणूक केली असा घटनाक्रम अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक अरुण आनंद किट्टद यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे. त्यावरून मूल्यमापक डुबे आणि तिन्ही कर्जदारांवर परळी शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी मोकाटचयाबाबत परळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास शेळके यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, असे सांगून त्यांनी भ्रमणध्वनी बंद केला.

टॅग्स :BeedबीडBanking Sectorबँकिंग क्षेत्रCrime Newsगुन्हेगारी