शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मनासारखी जमिनीची मोजणी न केल्याने शेतक-याने भूमी अभिलेख अधीक्षकास केली चाबकाने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 18:52 IST

आम्ही सांगितल्याप्रमाणे शेताची मोजणी का करत नाहीत असा जाब विचारात शेतकऱ्याने भूमी अभिलेख अधीक्षकास चक्क चाबकाने मारहाण केल्याची घटना आज सकाळी अंबाजोगाई बसस्थानकावर घडली.

ठळक मुद्देआम्ही सांगितल्याप्रमाणे शेताची मोजणी का करत नाहीत असा जाब शेतक-याने अधीक्षकास विचारला याचा राग धरत आरोपीने बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर अधीक्षकांना अडवून शिवीगाळ करत चाबकाने मारहाण केली.

अंबाजोगाई : आम्ही सांगितल्याप्रमाणे शेताची मोजणी का करत नाहीत असा जाब विचारात शेतक-याने  भूमी अभिलेख अधीक्षकास चक्क चाबकाने मारहाण केल्याची घटना आज सकाळी अंबाजोगाई बसस्थानकावर घडली. याप्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  अंबाजोगाई येथील भूमी अभिलेखमधील कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब दगडू गरकळ हे नेहमीप्रमाणे आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास बीडहून आलेल्या बसमधून अंबाजोगाई बस स्थानकावर उतरले आणि कार्यालयाकडे जाऊ लागले. यावेळी आरोपी रामधन दादाराव केंद्रे (रा. होळ, ता. केज) या शेतकऱ्याने त्यांना रस्त्यात अडविले आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे आमच्या शेताची मोजणी का केली नाही असा जाब विचारला.

यावर बाबासाहेब गरकळ यांनी न्यायालयाने दिलेल्या चतुःसीमे प्रमाणे तुमची मोजणी होऊ शकत नाही. मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या समक्ष तुमच्या शेताची पाहणी केली आहे, आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे मोजणी करू शकत नाही असे सांगितले. याचा राग मनात धरून आरोपी रामधन केंद्रे यांनी गरकळ यांना बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर अडवून शिवीगाळ करत चाबकाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तू इथे कशी काय नोकरी करतोस ते बघतो अशी धमकी दिली असे गरकळ यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सदर तक्रारीवरून रामधन केंद्रे याच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कलम ३५३, ३४२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहा. फौजदार बोडखे हे करत आहेत.  दरम्यान, सहा महिन्यापूर्वीच अंबाजोगाई येथील भूमि अभिलेख कार्यालयाचे प्रभारी उपअधिक्षक गोरखनाथ जाधव यांना राडी येथील शेतकरी मधुकर राजाराम पांडे याने मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आजही एका कर्मचाऱ्यास चाबकाने मारहाण करण्याचा प्रकार झाल्याने कर्मचाऱ्यात संतप्त वातावरण असून कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी