शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

विस्तार अधिकार्‍याला ‘बीडीओ’चा पदभार

By admin | Updated: May 23, 2014 00:17 IST

बीड :गेवराई येथील गटविकास अधिकारी महिन्याच्या रजेवर गेले असून त्यांचा पदभार सहायक गटविकास अधिकार्‍यास देण्याऐवजी विस्तार अधिकार्‍याला दिला आहे़

 बीड :गेवराई येथील गटविकास अधिकारी महिन्याच्या रजेवर गेले असून त्यांचा पदभार सहायक गटविकास अधिकार्‍यास देण्याऐवजी विस्तार अधिकार्‍याला दिला आहे़ त्यामुळे विस्तार अधिकारी आता सहायक गटविकास अधिकार्‍यांचा साहेब झाला आहे़ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांचा प्रस्ताव फेटाळून ‘सीईओं’नी हे आदेश काढले आहेत हे उल्लेखनीय़ गेवराई पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून जी़ बी़ सावंत हे कार्यरत आहेत़ ते १६ मे ते १४ जून या कलावधीसाठी वैद्यकीय रजेवर गेले आहेत़ त्यांच्यानंतर सहायक गटविकास अधिकारी बी़ डी़ चव्हाण यांनी कारभार पाहणे क्रमप्राप्त आहे; चव्हाण यांच्याकडे गटविकास अधिकारी पदाचा पदभार देण्यासाठीचा प्रस्तावही तयार झाला़ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आऱ आऱ भारती यांनी आदेश काढून अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव सीईओ राजीव जवळेकर यांच्याकडे पाठविला़ जवळेकर यांनी चव्हाण यांच्या नावाला आळा मारुन विस्तार अधिकारी (सांख्यिकी) वैभव जाधव यांना गटविकास अधिकारीपदाचा प्रभारी ‘चार्ज’ देण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे चव्हाण यांच्यावर अन्याय झाला असून ते वर्ग २ चे अधिकारी असताना वर्ग ३ कर्मचारी आता त्यांचा ‘बॉस’ झाला आहे़ दरम्यान, वर्ग ३ कर्मचार्‍याला गटविकास अधिकारीपदाचा प्रभार देण्यामागे कुठला ‘अर्थ’ दडला आहे? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे़ याबाबत सहायक गटविकास अधिकारी बी़ डी़ चव्हाण म्हणाले, यापूर्वीही मला डावलून कृषी अधिकार्‍याकडे प्रभारी चार्ज दिला होता़ यावेळी माझ्यावर अन्याय झाला़ आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले़ काय सांगतो नियम? याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आऱ आऱ भारती यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, नियमानुसार वर्ग ३ कर्मचार्‍यास वर्ग १ चा पदभार देता येत नाही़ शिवाय सक्षम अधिकारी असताना त्याला डावलून वर्ग ३ कर्मचार्‍यास चार्ज देता येत नाही़ गेवराईच्या बाबतीत मी चव्हाण यांनाच प्रभारी पदभार द्यावा, असा प्रस्ताव पाठवला; परंतु पुढे काय झाले ते सांगता येणार नाही़(प्रतिनिधी)जिल्ह्यात चार ठिकाणी गटविकास अधिकारी पदाचा प्रभारी वर्ग ३ कर्मचार्‍यांकडे आहे़ शिरुर, बीड़, आष्टी तालुक्यांचा त्यात समावेश आहे़ त्यापाठोपाठ आता गेवराईचीही भर पडली आहे़ सहायक गटविकास अधिकारीपदांवरील सक्षम अधिकारी असताना त्यांना डावलून वर्ग ३ कर्मचार्‍यांवर सीईओ राजीव जवळेकर इतके मेहेरबान कसे? याचे काडे मात्र कायम आहे़