शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये कामचुकार डॉक्टरसह सहा आरोग्य कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 09:16 IST

बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात घटत असली तरी मृत्यू राेखण्यात प्रशासन आणि आरोग्य विभाग अपयशी ठरलेले आहे.

बीड : आष्टी येथील कोविड केअर सेंटरमधील रुग्ण व नातेवाइकांच्या तक्रारी वाढल्यानंतर शनिवारी पहाटे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी आष्टी गाठत तपासणी केली. यावेळी अस्वच्छता, उपचारांतही हलगर्जी होत असल्याचेे लक्षात येताच पवार यांनी तत्काळ डॉक्टरसह सहा आरोग्य कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली.जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात घटत असली तरी मृत्यू राेखण्यात प्रशासन आणि आरोग्य विभाग अपयशी ठरलेले आहे. ज्या कोरोनाबाधितांना लक्षणे नाहीत अथवा कमी आहेत, अशांवर कोविड सेंटरमध्ये उपचार केले जातात. येथेही डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉयची नियुक्ती केलेली आहे; परंतु आष्टी कोविड सेंटरमध्ये सर्वत्र अस्वच्छता आणि रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच उपचारांकडेही डॉक्टर दुर्लक्ष करीत होते. याची दखल घेत डॉ. पवार यांनी भल्या पहाटे तपासणी केली असता त्यांना उपचारांमध्ये हलगर्जीपणा होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ डॉ. माधुरी पाचरणे या डॉक्टरसह अश्विनी पांतावणे, रूपाली काळे या परिचारिका आणि चार वॉर्डबॉयची हकालपट्टी केली. त्यानंतर या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. या कारवाईने इतर कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.कोरोना महामारीत कोणी हलगर्जी करीत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. चांगले काम केल्यास पाठीवर थाप असेल अन्यथा कारवाई करण्यात येईल. - डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड