शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेला रुग्ण पळवणाऱ्या डॉक्टरची हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 11:09 IST

डॉक्टरांनी स्वतःच्या खाजगी रुग्णालयात नेले उपचारासाठी

बीड : चार दिवसांपूर्वी एका अपघातातील रुग्णाला शासकीय रुग्णालयातून आपल्या खाजगी रुग्णालयात नेत उपचार केल्याचा प्रकार घडला होता. याची तक्रारही जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे करण्यात आली होती. चौकशी करून एका डॉक्टरची जिल्हा रुग्णालयातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली. कंत्राटी पद्धतीवर हा डॉक्टर कार्यरत होता. या प्रकरणाला शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनीही दुजोरा दिला आहे. 

जिल्हा रुग्णालयात सामान्य, गरीब रुग्ण येतात. आर्थिक परिस्थिती हालाकिची असल्याने शासकीय रुग्णालय त्यांच्यासाठी एक आधार असते. मात्र, याच रुग्णालयात कार्यरत असतानाही अनेकांची खाजगी रुग्णालये आहेत. हे डॉक्टर सरकारी रुग्णालयात तात्काळ सेवा देण्या ऐवजी आपल्या खाजगी रुग्णालयात रुग्णांची पळवापळवी करताना दिसून येत आहे. चार दिवसांपूर्वीही एका रुग्णालयाला कंत्राटी पद्धतीवर असलेल्या एका डॉक्टरने आपल्या खाजगी रुग्णालयात नेले. हा प्रकार लक्षात येताच एकाने याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे केली. यावर तात्काळ चौकशी समिती नियूक्त केली.  समितीच्या अहवालावरून संबंधित डॉक्टरवर जिल्हा रुग्णालयातून कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करण्यात आली. बुधवारी सकाळी ११ वाजताच ही कारवाई झाल्याचे समजते. या कारवाईला डॉ.थोरात यांच्याकडून दुजोरा मिळाला आहे. डॉक्टरचे नाव मात्र, अद्यापही समोर आलेले नाही.

(सविस्तर वृत्त लवकरच)

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड