शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकारी अभियंत्यांचा प्रताप; बिले काढण्यासाठी टक्केवारीने वसुली, कार्यालयातच स्वीकारल्या नोटा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 12:15 IST

सार्वजनिक बांधकाम विभाग हा कायमच वादात असतो. येथे पैसे घेतल्याशिवाय एकही काम होत नाही, अशी कायम ओरड असते.

- सोमनाथ खताळबीड : येथील बांधकाम विभागातील अधिकारी बिले काढण्यासाठी टक्केवारीने पैसे घेत असल्याचा व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. यात कार्यकारी अभियंता पुरूषोत्तम हाळीकर हे १ टक्क्याने पैसे मागत आहेत. तसेच नोटांचे बंडल खिशात घालत आहेत. यात हाळीकर यांनी अगोदर १० लाख रुपयांच्या बिलावर स्वाक्षऱ्या केल्याचे १० हजार रुपयांचीही मागणी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकाराने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. बांधकाम विभागातील ‘टक्केवारी’ने ‘वसुली’ करण्याचा प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग हा कायमच वादात असतो. येथे पैसे घेतल्याशिवाय एकही काम होत नाही, अशी कायम ओरड असते. तसेच बोगस कामे दाखविणे, रस्त्यांची कामे निकृष्ट असतानाही टक्केवारीने पैसे घेऊन कंत्राटदारांची बिले काढल्याच्या तक्रारी आहेत. काही दिवसांपूर्वीच याच कार्यालयातील एक अभियंता लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. आता पुन्हा वादग्रस्त असलेले कार्यकारी अभियंता पुरूषोत्तम हाळीकर हे देखील अडचणीत आले आहेत. एका कंत्राटदाराकडून रस्ता कामांचे बिल काढण्यासाठी पैसे स्वीकारले आहेत. तर आगोदर काढलेल्या १० लाख रुपयांच्या बिलात १ टक्क्याने १० हजार रुपये मागितले आहेत. येतानाच पैसे घेऊन येत जा, असा सल्लाही हाळीकर यांनी कंत्राटदाराला दिला आहे. याचा एक व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. या प्रकाराने आता खळबळ उडाली असून अभियंत्याविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

जानेवारी अखेरला सेवानिवृत्तहाळीकर हे जानेवारी अखेरला सेवानिवृत्त होत आहेत. परंतु या व्हिडिओमुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. आतापर्यंत पण त्यांनी पैसे घेतल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत, परंतु वरिष्ठांनी त्यांच्यावर कसलीच कारवाई केली नाही. त्यामुळेच त्यांचे दिवसेंदिवस मनोबल वाढत गेल्याचे सांगण्यात आले.

सीईओ पवार यांच्याविरोधातही तक्रारहाळीकर यांनी पैसे घेतल्याची तक्रार व्हिडिओसहीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्याकडे लेखी स्वरूपात अशोक काळकुटे यांनी केली होती. परंतु त्यांनीही यावर कसलीच चौकशी केली नाही. तसेच संपर्क साधल्यावरही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हाळीकर यांना पवार यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा आरोप केला जात आहे. आता हाळीकर यांच्यासह पवार यांच्याविरोधातही जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करण्यात आली आहे. पवार यांना संपर्क साधला, परंतु नेहमीप्रमाणे त्यांनी गुरुवारीही फोन घेतला नाही.

असे काही असेल तर मला माहिती नाही. मी पैसे घेतल्याचे आठवत नाही.- पुरूषोत्तम हाळीकर, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग बीड

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणBeedबीडAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग