शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणक्षेत्रात खळबळ; शिक्षिकेचा शाळेतच आत्महत्येचा प्रयत्न, मुख्याध्यापकासोबत वादाची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 16:19 IST

मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांच्यात मागील तीन वर्षांपासून वाद सुरु आहेत.

माजलगाव ( बीड ) : तालुक्यातील राजेवाडी येथील मुख्याध्यापक व शिक्षिकेचा वाद चांगलाच चिघळला आहे. आज संगिता राठोड या शिक्षिकेने शाळेच्या नव्या इमारतीत विषप्राशन केल्याने खळबळ उडाली.

राजेवाडी येथे जिल्हा परिषदेची चौथी पर्यंत शाळा भरत असून या ठिकाणी आठ शिक्षक काम करतात. या शिक्षकांपैकी मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड व शिक्षिका संगिता राठोड यांच्यात मागील 2-3 वर्षापासून वाद आहे. हा त्यांचा वाद गावक-यांनी अनेक वेळा मिटवला. मात्र, अद्यापही सुरु आहे. मागील महिन्यात 26 नोव्हेंबर रोजी मुख्याध्यापक जिंकलवाड आणि शिक्षिका राठोड या दोघांत पुन्हा  वाद झाले. यामुळे गावकऱ्यांनी शाळेच्या मुख्य गेटलाच कुलुप लावले. जोपर्यंत दोघांपैकी एकाची बदली होत नाही तोपर्यंत शाळेचे कुलुप उघडण्यात येणार नसल्याचा ठाम निर्णय ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना बोलून दाखवला. 

गावकऱ्यांच्या तक्रारीवरून शिक्षणाधिकाऱी यांनी दोघांना सोमवारी चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वीच या शिक्षिकेने आज दुपारी बारा वाजता शाळेच्या नवीन इमारतीत विषारी द्रव्य प्राशनकरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर माजलगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मुख्याध्यापकांना बडतर्फ करा मुख्याध्यापकाच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप संगिता राठोड यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच संबंधित मुख्याध्यापक जिंकलवाड यांना तत्काळ बडतर्फ करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. 

मला गोवण्यात येत आहे हाप्रकार नियोजनपूर्वक आहे. शिक्षिका व त्यांच्या नातेवाईकांकडुन मला गोवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड यांनी केला आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रBeedबीडzp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक